'रोहयो' तील मजुरांना २४ रुपयांची वेतनवाढ
By बाळकृष्ण दोड्डी | Published: April 26, 2024 06:27 PM2024-04-26T18:27:38+5:302024-04-26T18:28:09+5:30
२०२३ मध्ये २५६ रुपये इतकी मजुरी होती. त्यापूर्वी २०२२ मध्ये २४८ रुपये तसेच २०२१ मध्ये २३८ रुपये मजुरी होती.
सोलापूर : रोजगार हमी योजनेतील मजुरांना यंदा २४ रुपयांची वेतनवाढ मिळाली आहे. मागच्या वर्षी मजुरांना प्रतिदिन २७३ रूपये इतकी मजुरी होती. यंदा ती २९७ रुपये करण्यात आली. १ एप्रिल पासून याची अंमलबजावणी होत आहे.
२०२३ मध्ये २५६ रुपये इतकी मजुरी होती. त्यापूर्वी २०२२ मध्ये २४८ रुपये तसेच २०२१ मध्ये २३८ रुपये मजुरी होती. म्हणजे तीन वर्षात केवळ ५९ रुपयांची वेतनवाढ मिळाली आहे. ही वेतनवाढ नियमित असून दरवर्षी मार्च अखेर केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजना विभागाकडून नवीन वेतनवाढ जाहीर होते.