बार्शी तालुक्यातील २४ हजार १३१ शेतकºयांची बँक खातीच नसल्याने ४ कोटी दुष्काळी निधी बँकेतच पडूनच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:08 PM2018-01-25T13:08:33+5:302018-01-25T13:10:19+5:30
एकीकडे दुष्काळी निधी मिळत नसल्याची शेतकºयांची ओरड होत असताना दुसरीकडे बार्शी तालुक्यातील २४ हजार १३१ शेतकºयांचे बँकेत खातेच नसल्याने राज्य शासनाकडून आलेला ३ कोटी ९९ लाख ५६ हजार ६७ रुपये इतका दुष्काळी निधी महसूल खात्याकडे पडून आहे
भ. के. गव्हाणे
बार्शी दि २५ : एकीकडे दुष्काळी निधी मिळत नसल्याची शेतकºयांची ओरड होत असताना दुसरीकडे बार्शी तालुक्यातील २४ हजार १३१ शेतकºयांचे बँकेत खातेच नसल्याने राज्य शासनाकडून आलेला ३ कोटी ९९ लाख ५६ हजार ६७ रुपये इतका दुष्काळी निधी महसूल खात्याकडे पडून आहे. दरम्यान, शेतकºयांनी बँकेत खाते उघडून त्याचा क्रमांक देण्याचे आवाहन तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी केले आहे.
ज्या शेतकºयांनी पीक विम्याचे हप्ते भरले आहेत, अशा शेतकºयांना नुकसानभरपाई मिळाली आहे; मात्र त्यांच्या ज्वारी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने आर्थिक नुकसान देण्याचे जाहीर केले. त्याप्रमाणे पीक विम्याचे शेतकरी वगळून ६६ हजार ६५४ खातेदारांसाठी ११ कोटी ९७ लाख ३४ हजार ३४२ रुपये बार्शी तालुक्यासाठी उपलब्ध झाले होते. याबाबत महसूल विभागाने आवाहन केल्याप्रमाणे आजपर्यंत खाते नंबर मिळालेले १२ जानेवारी २०१८ पर्यंत ४२,२४६ शेतकºयांचे ४९ हजार ९९५.३६ हेक्टरसाठी ७ कोटी ९७ लाख ९४ हजार ११३ रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी संबंधित बँकेकडे जमा करण्यात आल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.
राहिलेले ३ कोटी ९९ लाख ५६ हजार ६७९ रुपये अनुदानाची रक्कम ही केवळ २४,१३१ बाधित शेतकºयांचे २५ हजार ७७४ हेक्टर क्षेत्राचे असून, त्यांचे बँक खाते नंबर संबंधित तलाठ्याकडे उपलब्ध नसल्यामुळे जमा करण्यात आले नाहीत. त्यासाठी अशा शेतकºयांची यादी संबंधित गावच्या तलाठ्यांनी गावातील चावडीच्या फलकावर प्रसिद्ध केलेली असतानासुद्धा यासाठी पात्र असलेल्यांनी खाते नंबर दिलेला नाही. तरी पात्र असलेल्यांनी तातडीने आपल्या बँकेच्या खातेपुस्तिकेची छायांकित प्रत तलाठ्यांकडे जमा करण्याबाबत तहसीलदार यांनी कळविले आहे.