सर्व शिक्षा अभियानातंर्गत सोलापूरात पहिली ते आठवीसाठी लागणार २४़५३ लाख पाठ्यपुस्तके

By admin | Published: April 11, 2017 01:48 PM2017-04-11T13:48:37+5:302017-04-11T13:48:37+5:30

.

24.55 million textbooks for the first to eighth of Solapur in Sarv Shiksha Abhiyan | सर्व शिक्षा अभियानातंर्गत सोलापूरात पहिली ते आठवीसाठी लागणार २४़५३ लाख पाठ्यपुस्तके

सर्व शिक्षा अभियानातंर्गत सोलापूरात पहिली ते आठवीसाठी लागणार २४़५३ लाख पाठ्यपुस्तके

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ११ : सारे शिकूया पुढे जाऊया असे म्हणत सुरू केलेल्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यासाठी यंदाच्या वर्षी २४ लाख ५३ हजार ८८१ प्रति लागणार असून, तशी मागणी जि़प़ प्राथमिक शिक्षण विभागाने पुण्याच्या बालभारतीकडे केली आहे़
इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणारे बालक पुस्तकांपासून वंचित राहू नयेत आणि केवळ पुस्तकांअभावी शिक्षणात अडचणी येऊ नयेत, शाळेतील सर्व मुलांची १०० टक्के उपस्थिती टिकावी, गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी मुलांना सर्वशिक्षा अभियानातून प्रतिवर्षी मोफत पुस्तके दिली जातात़ यावर्षी महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व अंशत: अनुदानित खासगी प्राथमिक, शासकीय शाळा, अनुदानित अशा सर्व प्रकारच्या शाळांना ही पुस्तके मोफत पुरविली जाणार आहेत़ बालभारती, पुणे येथून जिल्ह्यास तालुकास्तरापर्यंत क्रमिक पाठ्यपुस्तकांचा पुरवठा मे २०१७ पासून करण्यात येणार आहे़ तालुकास्तरावर प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके गटशिक्षणाधिकाऱ्यांना तालुकास्तरावरुन केंद्र व शाळास्तरापर्यंत सर्व माध्यमांच्या शाळांना देण्यात येणार आहेत़
उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर १५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू होणार असून, पात्र विद्यार्थ्यांना तालुक्यातील लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक नागरिक व पालकांच्या समक्ष ही पुस्तके समारंभपूर्वक दिली जाणार आहेत़ पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या पाल्यांसाठी पाठ्यपुस्तके खासगी वितरकांकडून खरेदी करु नयेत, असे आवाहन जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)
माध्यमनिहाय मुलांची संख्या
एकूण मुले-४५०७३३
मराठी माध्यमातील मुले-२३२३२१९
उर्दू माध्यमातील मुले-७३४६३
कन्नड माध्यमातील मुले-५७१९९
----------------------
तालुकानिहाय विद्यार्थीसंख्या आणि लागणारी पुस्तके
अक्कलकोट-३९६७२ - २२२२५०
बार्शी-४४९२४ - २४२७८४
करमाळा-३०१९१ - १६३७३६
माढा-३७४१३ -२०१०९९
माळशिरस-५९७८७ -३२७१८५
मंगळवेढा-२८७५८ - १५७५१८
मोहोळ-३५७०८ - १९२१२८
पंढरपूर-५४६७२ - २९६०५१
सांगोला-४०६४१ - २२१८४४
उ़सोलापूर-४२८०४ - २३३६०४
द़सोलापूर-३६१६३ - १९५६७२
एकूण-४५०७३३ - २४५३८८१
----------------------
जिल्ह्यासाठी एकूण २४ लाख ५३ हजार ८८१ पाठ्यपुस्तके लागणार असून, याबाबत पुण्याच्या बालभारती संचालकांकडे तालुकानिहाय आॅनलाईन मागणी करण्यात आली आहे़ शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके देण्यात येतील़
- एस़जी़ क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी (जि़प़प्राथ़)

Web Title: 24.55 million textbooks for the first to eighth of Solapur in Sarv Shiksha Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.