करमाळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीमध्ये २५ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:43 AM2021-02-05T06:43:33+5:302021-02-05T06:43:33+5:30

करमाळा : करमाळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने हमालांना हमालीत २५ टक्के वाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ...

25 per cent increase in Hamali in Karmalya Agricultural Produce Market Committee | करमाळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीमध्ये २५ टक्के वाढ

करमाळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीमध्ये २५ टक्के वाढ

Next

करमाळा : करमाळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने हमालांना हमालीत २५ टक्के वाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी दिली.

बाजार समितीच्या करमाळा येथील सभागृहात सभापती बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी २ वाजता बैठक पार पडली. त्यात हमालीत वाढ करण्याचा निर्णय घेण्याची सूचना गटनेते दिग्विजय बागल यानी मांडली. त्याला उपसभापती चिंतामणी जगताप यांनी अनुमोदन दिले.

हमालांना हमालीत घसघशीत २५ टक्के वाढ मिळाल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. हमालीत वाढ करण्याचा विषय दर तीन वर्षातून एकदाच नियमानुसार संचालक मंडळासमोर येतो. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबरोबरच आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणे, कर्मचारी सेवा नियमांच्या भंगाबाबत चौकशी समिती नेमणे आदी विषयही एकमताने मंजूर करण्यात आले.

या बैठकीला संचालक आनंदकुमार ढेरे, रंगनाथ शिंदे, संतोष वारे, सरस्वती केकान, अमोल झाकणे, वालचंद रोडगे, शैला लबडे, मयूर दोशी, विजय गुगळे, दादा मोरे, सदाशिव पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव सुनील शिंदे यांनी केले तर सभापती बंडगर यांनी आभार मानले.

कोट घेणे

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने हमालांच्या हमालीत पंचवीस टक्के वाढ करून कष्टकऱ्यांना न्याय दिला आहे. सभापती व संचालक मंडळाचे आभार मानतो.

ॲड. राहुल सावंत, अध्यक्ष, हमाल पंचायत, करमाळा.

----

Web Title: 25 per cent increase in Hamali in Karmalya Agricultural Produce Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.