सांगोल्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील २५ घरे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:22 AM2021-04-08T04:22:47+5:302021-04-08T04:22:47+5:30
या योजनेत पात्र लाभार्थीला स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य शासनाचे १ लाख व केंद्र शासनाचे १.५ लाख असे २.५ लाख ...
या योजनेत पात्र लाभार्थीला स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य शासनाचे १ लाख व केंद्र शासनाचे १.५ लाख असे २.५ लाख वितरित करण्याची तरतूद आहे. या २५ पात्र लाभार्थीना बांधकामाच्या टप्प्यानुसार प्रत्येकी २ लाखांचे अनुदान वितरित केले होते, त्यामुळे आता घर बांधकाम पूर्ण करून नगर परिषदेत रीतसर वापर परवाना घेतला असल्याने त्यांना उर्वरित ५० हजारांचे अनुदान वितरित केले.
सांगोला नगर परिषदेस प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत आजअखेर ४ सविस्तर प्रकल्प अहवालांमध्ये ४२३ घरकुलांना शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. मंजूर घरकुलांपैकी १४९ घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथावर असून, ७५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. घरकुलांचे बांधकाम पूर्ण केलेल्या; परंतु अंतिम हफ्ता न मिळालेल्या या ५० लाभार्थींनी नगर परिषदेकडे कागदपत्रांची पूर्तता करून वापर परवाना घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले.