अबब... उजनीमध्ये सापडला २५ किलोचा मासा!

By रवींद्र देशमुख | Published: July 28, 2023 05:49 PM2023-07-28T17:49:20+5:302023-07-28T17:50:03+5:30

मच्छीमार भंडारी यांना सापडलेला हा कटला जातीचा मासा मच्छी मार्केटमध्ये विक्रीसाठी नेल्यानंतर याला २०० रुपये प्रति किलो प्रमाणे या एका माशाचे ५ हजार रुपये मिळाले आहेत.

25 kg fish found in Ujni solapur | अबब... उजनीमध्ये सापडला २५ किलोचा मासा!

अबब... उजनीमध्ये सापडला २५ किलोचा मासा!

googlenewsNext

सोलापूर : वाशिंबे (ता. करमाळा) येथे उजनी जलाशयातील ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाजवळ मच्छीमारी करत असताना मच्छीमारास कटला जातीचा चक्क २५ किलो वजनाचा मासा सापडला.

जिल्ह्याच्या घाट माथ्यावर होत असलेल्या पावसामुळे उजनी जलाशयात संथगतीने पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. यामुळे विविध जातींचे मासे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. एकेकाळी उजनी जलाशयाचे अथांग गोड पाणी चवदार माशांचे सर्वात मोठे आगर म्हणून ओळखले जात होते. परंतु जलाशयात वाढते प्रदूषण व परप्रांतीय मच्छीमारांकडून होत असलेली बेसुमार मच्छीमारी यामुळे अस्सल गावरान मासे नामशेष होत आहेत.

मच्छीमार भंडारी यांना सापडलेला हा कटला जातीचा मासा मच्छी मार्केटमध्ये विक्रीसाठी नेल्यानंतर याला २०० रुपये प्रति किलो प्रमाणे या एका माशाचे ५ हजार रुपये मिळाले आहेत. उजनी जलाशयात स्थानिक मच्छीमार व आंध्र प्रदेशातील मच्छीमार व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहे. उजनी बॅकवॉटर परिसरात मोठ्या प्रमाणावर मच्छीमारी केली जात असून चिलापी, रव, कटला, वाम, गुगळी, शिंगटा, जातीचे मासे धरणाच्या पाण्यात सापडतात.

Web Title: 25 kg fish found in Ujni solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.