इदगाह मैदान सुशोभीकरणासाठी २५ लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:22 AM2021-07-26T04:22:15+5:302021-07-26T04:22:15+5:30
ईदगाह मैदानासाठी नगरपालिकेकडून आरक्षित असलेल्या ५७ गुंठे क्षेत्राची मोजणी करून, हद्दी, खुणा कायम करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाठपुरावा ...
ईदगाह मैदानासाठी नगरपालिकेकडून आरक्षित असलेल्या ५७ गुंठे क्षेत्राची मोजणी करून, हद्दी, खुणा कायम करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाठपुरावा केला होता. नुकतीच या जागेची रीतसर मोजणी होऊन हद्दी, खुणा कायम करून, या जागेचा नकाशा नगरपालिकेला मिळाला आहे. येथे कोणकोणत्या सोईसुविधा करावयाच्या आहेत, या दृष्टीने विचारविनिमय करण्यास मुस्लीम नगरसेवकांसह समाज बांधवांची बैठक आमदार शहाजीबापू पाटील यांनी बोलविली होती.
या बैठकीला माजी आ.दीपक साळुंखे-पाटील, प्रा.पी.सी. झपके, बाबुराव गायकवाड, तानाजी पाटील, रफिक नदाफ, ॲड.उदयबापू घोंगडे, अभियंता आकाश करे, नगरसेवक जुबेर मुजावर, अस्मीर तांबोळी, रफिक तांबोळी, सोमनाथ लोखंडे, अनिल खडतरे, हाजी शब्बीरभाई खतीब, दिलावर तांबोळी, युसुफ मुलाणी, शिवसेना शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब, तोहीद मुल्ला, आलमगीर मुल्ला, सागर पाटील, आनंद घोंगडे, हमीदभाई इनामदार, निसार तांबोळी, पोपट खाटीक आदी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार काँग्रेसचे सुनील भोरे यांनी मानले.
कोट :::::::::::
मला आमदार निधीतून एका कामासाठी जास्तीतजास्त २५ लाख रुपये देता येतात. त्यामुळे मी या वर्षाच्या निधीतून २५ लाख रुपये ईदगाह मैदानाच्या संरक्षक भिंती व सुशोभीकरणासाठी मंजूर करीत आहे. यापुढील कामाकरिता अजून कितीही निधी लागला, तरी तो देणार असून, सुसज्ज असे प्रार्थनास्थळ बनविण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.
ॲड.शहाजीबापू पाटील, आमदार, सांगोला