जिवंत शंख देताे सांगत भोंदूने उकळले २५ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 12:16 PM2024-04-05T12:16:39+5:302024-04-05T12:16:58+5:30

Solapur Crime News: भोंदू महाराजासह पाच जणांनी विश्वासात घेऊन दुप्पट पैशांचे आमिष दाखवत एकास जिवंत शंख देतो असे सांगून त्या शंखाच्या पूजेसाठी म्हणून २५ लाख ५० हजार रुपये घेऊन त्याची फसवणूक केली.

25 lakhs was stolen by a hypocrite saying that he gives live conch | जिवंत शंख देताे सांगत भोंदूने उकळले २५ लाख

जिवंत शंख देताे सांगत भोंदूने उकळले २५ लाख

 सांगोला (सोलापूर) : भोंदू महाराजासह पाच जणांनी विश्वासात घेऊन दुप्पट पैशांचे आमिष दाखवत एकास जिवंत शंख देतो असे सांगून त्या शंखाच्या पूजेसाठी म्हणून २५ लाख ५० हजार रुपये घेऊन त्याची फसवणूक केली.

हा प्रकार दि. २१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान सांगोला तालुक्यात खिलारवाडी येथे घडला. याबाबत सचिन हरिदास यादव (रा. खिलारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. जिवंत शंख विकून दुप्पट पैसे मिळतील, या आमिषाने फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी मेघराज आवताडे ऊर्फ बाबा पाटील (रा. फळवणी), भोंदू महाराज सुरेश पोपट पारसे (रा. कोळेगाव, ता. माळशिरस), अनिल मोरे व सलीम (दोघे रा. सांगोला) व २५ ते ३० वर्षीय अनोळखी स्त्री अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 25 lakhs was stolen by a hypocrite saying that he gives live conch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.