मोफत आरोग्य शिबिराचा २५० महिलांनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:25 AM2021-03-01T04:25:53+5:302021-03-01T04:25:53+5:30
यावेळी डॉ. सुप्रिया संगोळगी, डॉ. सचिन संगोळगी, डॉ. सचिन कोरे यांनी महिलांच्या विविध प्रकारच्या अडचणी ऐकून तपासणी केली. हे ...
यावेळी डॉ. सुप्रिया संगोळगी, डॉ. सचिन संगोळगी, डॉ. सचिन कोरे यांनी महिलांच्या विविध प्रकारच्या अडचणी ऐकून तपासणी केली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सुनील नलवार, सिद्धाराम पाटील, अजय मलवे, रितिका क्षीरसागर, किरण देशपांडे, वैशाली कटकधोंड, भारती स्वामी यांनी परिश्रम घेतले. या शिबिरात हिमोग्लोबिन तपासणी, कॅल्शिअम टेस्ट, प्रसूतिपूर्व व प्रसूतिपश्चात मोफत तपासणी व उपचार, वंध्यत्व निवारण सल्ला, मासिक पाळीच्या समस्या, त्यावर सल्ला व उपचार, कुटुंब नियोजन सल्ला, मशीनच्या साहाय्याने स्त्रियांसाठी हाडे ठिसूळ न होण्यावर उपाययोजना, यासह विविध आजारांवर मार्गदर्शन केले.
कोट :::::::::::
वर्षातून एक दिवस गोरगरिबांसाठी म्हणून मोफत तपासणी व उपचार करण्याचे शिबिर दरवर्षी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त करण्याचे निश्चित केले आहे. तरी याचा तालुक्यातील गोरगरीब, गरजू महिलांचा लाभ घ्यावे.
-डॉ. सुप्रिया संगोळगी
फोटो
२८अक्कलकोट- आरोग्य शिबिर
ओळी
अक्कलकोट येथील मोफत शिबिरात महिलांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन करताना डॉ. सुप्रिया संगोळगी.