दररोज जमा होणाऱ्या २५०० किलो वैद्यकीय कचऱ्याला सोलापुरात लावतात आग
By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 27, 2023 10:12 PM2023-02-27T22:12:29+5:302023-02-27T22:12:58+5:30
मेडिकल हब म्हणून सोलापूरची ख्याती आहे.
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : मेडिकल हब म्हणून सोलापूरची ख्याती आहे. अशा या मेडिकल हबमध्ये रोज २५०० किलोहून अधिक मेडिकल कचरा अर्थात जैववैद्यकीय कचरा जमा होत आहे. बायोक्लिन या कंपनीकडून भोगाव डेपोत दररोज बायोमेडिकल कचरा नष्ट अर्थात जाळण्याचे करण्याचे काम चालते. याकरिता एकूण बारा गाड्या कार्यरत आहेत. जिल्ह्यातील १९०३ हॉस्पिटलमधून वैद्यकीय कचरा गोळा केला जातो.
ही आकडेवारी कंपनीकडून मिळाली आहे. प्रत्यक्षात याहून अधिक कचरा रुग्णालयातून बाहेर पडत असल्याची माहिती आहे. घरगुती कचरा ज्या पद्धतीने गोळा करून नष्ट करण्याचा ठेका ठेकेदारांना देण्यात आला आहे, त्याच पद्धतीचा ठेका बायक्लिन कंपनीला बायोमेडिकल कचरा नष्ट करण्याचे काम दिले आहे. याकरिता छोट्या क्लिनिकला २६६ रुपये फी, तर मोठ्या हॉस्पिटलकडून प्रत्येक बेड मागे रूपये पाच शुल्क घेतात. शस्त्रक्रिया साहित्य, सलाईनच्या प्लास्टिक बॅगा, युरिन बॅगा, ब्लड बॅगा, इंजेक्शन्स, बँडेज, प्लास्टर यासह इतर बायोमेडिकल कचरा रोज गोळा केला जातो. सलाईन बॉटल व इतर प्लास्टिक कचरा रिसायकलिंग केला जात असल्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर निकामी झालेला मानवी अवयव, मांस किंवा मांसचा तुकडा देखील बायोमेडिकल कचऱ्यात जमा होतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"