साेलापुरातील प्राॅपर्टी टॅक्सची २५ हजार बिले वेबसाईटवरुन गायब... कारण काय जाणून घ्या
By राकेश कदम | Published: July 4, 2024 11:55 AM2024-07-04T11:55:02+5:302024-07-04T11:55:25+5:30
महापालिकेने कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर म्हणाले, महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षातील प्राॅपर्टी टॅक्सची दाेन लाख बिले वेबसाईटवर अपलाेड केली हाेती.
महापालिकेने जून महिन्यात वेबसाईटवर अपलाेड केलेली प्राॅपर्टी टॅक्सची २५ हजारहून अधिक प्राॅबिले गायब झाली आहेत. नागरिकांनी चिंता करू नये. लवकरच ही बिले पुन्हा अपलाेड हाेतील असे सांगताना पालिकेने बिले गायब हाेण्याचे कारणही सांगितले आहे.
महापालिकेने कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर म्हणाले, महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षातील प्राॅपर्टी टॅक्सची दाेन लाख बिले वेबसाईटवर अपलाेड केली हाेती. यातील अनेक बिलांमध्ये मिळकतदारांना खासगी पाणीपट्टीसाेबत सार्वजनिक पाणीपट्टीची आकारणी झाली आहे. ही दुबार पाणीपट्टी रद्द करण्याची मागणी अनेक मिकतदारांनी केली.
वास्तविक नागरिकांना एकच पाणीपट्टी आकारणी करणे अपेक्षित आहे. आमच्या कर संकलन विभागाकडून यात चूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे ही बिले मागे घेण्यात आली आहेत. मागे घेण्यात आलेल्या बिलांची संख्या २५ हजार आहे. लवकरच ही बिले अपलाेड हाेतील. नागरिकांनी चिंता करू नये, असे आवाहन गाडेकर यांनी केले.