उत्तर तालुक्यातील रस्त्यासाठी मिळाले २६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:28 AM2021-02-17T04:28:05+5:302021-02-17T04:28:05+5:30

वर्षभरात राज्य शासनाने रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर केला मात्र कोरोनामुळे कामे सुरू करता आली नाहीत. आता ही कामे सुरू ...

26 crore for road in Uttar taluka | उत्तर तालुक्यातील रस्त्यासाठी मिळाले २६ कोटी

उत्तर तालुक्यातील रस्त्यासाठी मिळाले २६ कोटी

Next

वर्षभरात राज्य शासनाने रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर केला मात्र कोरोनामुळे कामे सुरू करता आली नाहीत. आता ही कामे सुरू होणार आहेत. यामध्ये उत्तर सोलापूर तालुका निधी खेचण्यात सरस ठरला आहे. बीबीदारफळ- सावळेश्वर, खुनेश्वर-रानमसले, शेळगाव-कौठाळी, कौठाळी-मुंगशी, नरखेड- मसलेचौधरी- वडाळा, कौठाळी- पडसाळी-रानमसले, रानमसले-बीबीदारफळ- कोंडी या ४७ किलोमिटर रस्त्यासाठी १० कोटी ५० लाख रुपये मिळाले आहेत.

गावअंर्तगत सिमेंट रस्त्यासाठी वडाळा येथे ३२ लाख २१ हजार, गावडीदारफळ येथे ८ लाख ८८ हजार, कळमण येथे ८ लाख ८८ हजार, होनसळ येथे ८ लाख ८८ हजार, नान्नज येथे १३ लाख ८८ हजार, पडसाळी ९ लाख ४४ हजार, भागाईवाडी ४ लाख ४४ हजार, मार्डी १४ लाख ४३ हजार, रानमसले व एकरुख- तरटगाव गावासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये मंजूर आहेत. वडाळा येथील शासकीय वसतिगृह अद्यावत करण्यासाठी ८५ लाख १८ हजार रुपये मंजूर झाले आहेत.

---

पाकणीफाटा-पाकणी सिमेंट रस्ता..

पाकणी फाटा ते डेपो, डेपो ते गावापर्यंत बाह्यवळण रस्ता,

पाकणी-तिर्हे -तेलगाव, डोणगाव-तेलगाव, सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग ते बीबीदारफळ या रस्त्यासाठीही निधी मिळाला आहे. ऑइल कंपन्यांच्या निधीतून १४ कोटी रुपयातुन सिमेंट रस्त्याचे काम होणार असल्याचे सरपंच शोभाताई गुंड यांनी सांगितले. पाकणी फाटा ते कोट उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावातून ज्या-ज्या रस्त्यांची मागणी आहे त्याप्रमाणे सर्वच रस्त्यांना दोन वर्षांत निधी घेण्याचे नियोजन आमदार यशवंत माने यांनी केले आहे. यासाठी सरपंच व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी स्पष्ट केले.

----

Web Title: 26 crore for road in Uttar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.