भैरवनाथ हायस्कूलचे २६ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्तेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:25 AM2021-08-22T04:25:59+5:302021-08-22T04:25:59+5:30
कुरुल : राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत अंकोलीतील भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील २६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत ...
कुरुल : राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत अंकोलीतील भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील २६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान पटकावला आहे. विद्यालयातील ४८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी २६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.
साक्षी पटणे ही जिल्ह्यातून सर्वसाधारण गटातून पाचवी व ओबीसीमधून पहिली तर अरमान शेख जिल्ह्यातून सर्वसाधारण गटातून बारावा आला. तसेच मयूरी घोडके, कोमल गायकवाड, वैष्णवी इंगळे, पीयूष गवळी, विशाखा गवळी, दीक्षा सोनवणे, ओम मगर, सानिका घोडके, वैष्णवी फडतरे, ओम घोडके, प्रतीक गरड, स्नेहा सरवळे, मयूर पाटील, गिरीश भंडारे, ज्ञानेश्वर शिंदे, ओम पवार, सूरज फराटे, करण पवार, सम्राट रणदिवे, विश्वजित भुसे, सुजीत शिंदे, उमेश कांबळे, निशा गवळी, राजश्री बरडे या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. उपक्रमशील शिक्षक हनुमंत राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, सचिव शिवणकर, विभागीय चेअरमन संजीव पाटील, सहसचिव संजय नागपुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे, शाळा समिती अध्यक्ष बाबासाहेब क्षीरसागर, सदस्य सज्जनराव पवार, सदस्य संग्रामसिंह पवार, सरपंच पांडुरंग येळवे, मुख्याध्यापक दिलीप पाटील, माजी मुख्याध्यापक पांडुरंग सोलंकर, केंद्रप्रमुख तिपण्णा कमळे, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक धनंजय सुरवसे यांनी कौतुक केले.
----
फोटो : २१ भैरवनाथ स्कूल
भैरवनाथ विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, सोबत सदस्य बाबासाहेब क्षीरसागर, मुख्याध्यापक दिलीप पाटील, हनुमंत राऊत.