सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखाने सुरू, यंदाच्या हंगामात ५ लाख ६२ हजार लाख मे़टन ऊसाचे झाले गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:14 PM2017-11-10T13:14:16+5:302017-11-10T13:15:09+5:30
ऊसदराची निश्चिती अद्याप झाली नसली तरी सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखाने आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून, त्यांनी गुरुवारपर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ३६७ लाख मेट्रिक टन गाळप केले आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १० : ऊसदराची निश्चिती अद्याप झाली नसली तरी सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखाने आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून, त्यांनी गुरुवारपर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ३६७ लाख मेट्रिक टन गाळप केले आहे. तीन साखर कारखाने सुरू होणे बाकी आहेत.
सध्या ऊसदराचा विषय ऐरणीवर असला तरी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी धाडसाने कारखाने सुरू केले आहेत. एकीकडे शेतकरी संघटना आंदोलनाची भाषा करीत आहे तर दुसरीकडे शेतकºयांना ऊस घालण्याची चिंता आहे. याशिवाय शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न मार्गी लावल्याने व सदाभाऊ खोत मंत्री असल्याने आंदोलनाची धार पूर्वीसारखी राहिली नसल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस असल्याने व यावर्षी जून महिन्यात चांगला पाऊस पडल्याने उसाची वाढ चांगली झाल्याने यावर्षी एकरी अधिक उतारा पडू लागल्याने शेतकºयांनाही ऊस घालण्याची चिंता आहे. यावर्षी जवळपास १० साखर कारखाने बंदच राहण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत २६ साखर कारखान्यांनी ५ लाख ६२ हजार ३६७ लाख मेट्रिक टन गाळप झाले होते.
----------------
मेट्रिक टन गाळप कारखाने...
लोकमंगल बीबीदारफळ- १० हजार ५११ लाख मे.टन, लोकमंगल भंडारकवठे- ४ हजार ८८५ लाख मे.टन, लोकनेते- ४३ हजार ७१४ मे.टन., भीमा- १८ हजार ८८० मे.टन., चंद्रभागा- १५,५०२ मे.टन., विठ्ठल गुरसाळे- ६१५५ मे.टन., विठ्ठलराव शिंदे- एक लाख ४ हजार ४७७ मे.टन., सासवड माळी शुगर- २५ हजार ६० मे. टन., सहकार महर्षी- ६१,७५७ मे.टन., पांडुरंग श्रीपूर- ५००० मे.टन., सिद्धेश्वर- ३,५०० मे.टन., मकाई करमाळा- ७ हजार ५६० मे.टन., आदिनाथ- ९,४१९ मे.टन., संत दामाजी- १०,६७० मे.टन., विठ्ठल शुगर म्हैसगाव- १०,२९२, सिद्धनाथ तिºहे- ११,६९० मे.टन., जकराया शुगर- १३,९०० मे.टन., इंद्रेश्वर बार्शी- ३१ हजार ५० मे.टन., भैरवनाथ विहाळ- ३१, ३७० मे.टन., फॅबटेक शुगर- १७,८८५ मे.टन., युटोपियन- २७,८५० मे.टन., भैरवनाथ लवंगी- १४,९२० मे.टन., बबनराव शिंदे शुगर- १८,१६० मे.टन., जयहिंद शुगर- २५ हजार मे.टन., शंकररत्न आलेगाव- २४,५७० मे.टन., गोकुळ शुगर धोत्री- ७७९० मे.टन.