२१ नवीन बंधाऱ्यांसह साठवण तलावांसाठी २७ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:21 AM2021-03-08T04:21:54+5:302021-03-08T04:21:54+5:30
आ. शहाजीबापू पाटील यांनी शेतीचे पाणी, रस्ते सुधारणा, हायमास्ट दिवे, वीज वितरण कंपनीचे सबस्टेशन, तहसील कार्यालय नूतनीकरणासाठी भरीव निधीची ...
आ. शहाजीबापू पाटील यांनी शेतीचे पाणी, रस्ते सुधारणा, हायमास्ट दिवे, वीज वितरण कंपनीचे सबस्टेशन, तहसील कार्यालय नूतनीकरणासाठी भरीव निधीची तरतूद यासह कोट्यवधी रुपये खर्चून विकासकामांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्याचे चित्र बदलताना दिसत आहे. दुष्काळी तालुक्याची ओळख कायमस्वरूपी पुसण्यासाठी शेतीला पाणी मिळाले तरच शेतकरी समृद्ध होणार आहे.
बंधारे, साठवण तलाव दुरुस्तीसाठी मंजूर निधी
कटफळ बंधारा क्र. १ (५३.०१ लक्ष), बंधारा क्र. २ (६७.१६ लक्ष), बंडगरवाडी बंधारा क्र. १ (५८.४३ लक्ष), बंधारा क्र. २ (६८.८७ लक्ष), चिकमहूद बंधारा क्र. १ (७४.३९ लक्ष), बंधारा क्र. २ (६३.१५ लक्ष), बंधारा क्र. ३ (७४.३९ लक्ष), महूद बु. बंधारा क्र. १ (६०.२६ लक्ष), महूद बु. बंधारा क्र. २ (८४.१५ लक्ष). महुद बु. बंधारा क्र. ३ (६७.५७ लक्ष), महुद बु. बंधारा क्र. ४ (७६.०९ लक्ष), नाझरे-अनकढाळ बंधारा क्र. १ (१२१.८३ लक्ष), बंधारा क्र. २ (१००.१४ लक्ष), गळवेवाडी बंधारा (१२०.७८ लक्ष), जुजारपूर बंधारा (८२.५६ लक्ष), मेडशिंगी बंधारा (८७.७२ लक्ष), आलेगाव बंधारा क्र. १ (९०.२८ लक्ष). बंधारा क्र. २ (७८.५३ लक्ष), घेरडी बंधारा (६३.९२ लक्ष), हातीद बंधारा (१०५.५० लक्ष) तसेच कोल्हापूर पद्धतीचा बंधारा हातीद (३००.१२ लक्ष) व राजुरी येथील साठवण तलावासाठी ४१९.२० लक्ष असा एकूण सुमारे २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.