सोलापूर शहरात २७ ठिकाणी स्वच्छता रॅली, १९३ शाळांमधील २० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:53 AM2018-09-27T11:53:01+5:302018-09-27T11:58:06+5:30
सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सोलापूर शहरात २७ ठिकाणी स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सोलापूर शहरात २७ ठिकाणी स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात हुतात्मा चौकात चार पुतळ्यास व अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते व महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे आणि गटनेते आनंद चंदनशिवे नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
परमवीर संस्कृती क्रीडा मंडळाच्या वतीने स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.त्यानंतर महापौर शोभाताई बनशेट्टी व महापालिका आयुक्त अविनाश ढाकने यांनी झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. यावेळी गटनेते आनंद चंदनशिवे ,नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेवक भारत बडूरवाले, सहायक आयुक्त सुनील माने, प्रशासन अधिकारी सुधा साळुंख, जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे, बाहुबली भूमकर, विठ्ठल सोनकांबळे ,गिरीश तंबाके स्वप्निल शहा, राहुल कुलकर्णी, राहुल नागमोती ,सुरेश लिंगराज, भास्कर समलेटी तसेच या रॅलीमध्ये सोलापूर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते ही रॅली चार पुतळा येथून निघून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून नविवेस पोलीस चौकी, शिवाजी चौक मार्गे संभाजी चौकात समारोप करण्यात आली.
-----------------
याठिकाणी झाली स्वच्छता रॅली...
पार्क चौक ते पूना नका, पंजाब तालीम ते बाळीवेस ,दमानी नगर ते शेटे वस्ती, डीआरएम आॅफिस ते कोनापुरे चाळ रेल्वे स्टेशन परिसर, रामवाडी दवाखाना ते सलगर वस्ती, कोळी समाज ते आपणा बाजार, सुंदरम नगर ते अमृत नगर, चैतन्य भाजी मार्केट ते कुमठेकर दवाखाना, लष्कर ते जगदंबा चौक, सात रस्ता ते मसीहा चौक, कुमठा नाका ते नई जिंदगी, बेडर फुल ते लोधी गल्ली, सिव्हिल चौक ते गेंट्ट्याल टॉकीज, जोडबसवांना चौक ते पाण्याची टाकी, संभाजीराव शिंदे प्रशाला ते विडी घरकुल परिसर, कुचन प्रशाला ते रवीवार पेठ परिसर, किसान नगर ते संगमेश्वर नगर,बलिदान चौक ते घोंगडे वस्ती, बाळीवेस ते सम्राट चौक, सिद्धेश्वर मंदिर ते जिल्हा परिषद,रंगभवन ते होम मैदान, विजापूर वेस ते भारतीय चौक, सिद्धेश्वर पेठ ते किडवाई चौक, मार्कन्डे नगर ते आकाशवाणी केंद्र ,नीलम नगर ते सुनील नगर, शेळगी परिसर असून एकूण २७ ठिकाणाहून ही रॅली निघाली़ या रॅलीमध्ये एकूण १९३ शाळा सहभागी झाले असून एकूण २० हजार विद्यार्थी मध्ये सहभागी झाले होते.