पंढरपूरसाठी २७०० काेटी रुपयांचा विकास आराखडा; देवेंद्र फडणवीस यांची घाेषणा  

By राकेश कदम | Published: May 25, 2023 06:58 PM2023-05-25T18:58:19+5:302023-05-25T18:58:32+5:30

भाजपच्या वतीने गुरुवारी गांधीनगर येथील एका मंगल कार्यालयात विजय महासंकल्प मेळावा झाला.

2700 crore development plan for Pandharpur Devendra Fadnavis' announcement | पंढरपूरसाठी २७०० काेटी रुपयांचा विकास आराखडा; देवेंद्र फडणवीस यांची घाेषणा  

पंढरपूरसाठी २७०० काेटी रुपयांचा विकास आराखडा; देवेंद्र फडणवीस यांची घाेषणा  

googlenewsNext

साेलापूर : जगभरातील भाविकांना वैशिष्ठ्यपूर्ण पंढरपूर पाहता यावे यासाइी २७०० काेटी रुपयांचा तिर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्याचे एकूण तीन डिझाइन आहेत. यापैकी एका डिझाइनला पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लवकरच मंजुरी देईल, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जाहीर केले.

भाजपच्या वतीने गुरुवारी गांधीनगर येथील एका मंगल कार्यालयात विजय महासंकल्प मेळावा झाला. यावेळी ते बाेलत हाेते. मंचावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डाॅ. जयसिध्देश्वर शिवाचार्य, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह माेहिते-पाटील, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे, शहराध्यक्ष विक्रम देशमुख आदी उपस्थित हाेते. फडणवीस म्हणाले, पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अंतर्गत कामांसाठी ७० काेटी रुपये मंजूर केल आहेत. याप्रमाणे संपूर्ण तीर्थक्षेत्रात २७०० काेटी रुपयांची कामे हाेतील. आजवरचा राज्यातील सर्वात माेठा तिर्थक्षेत्र आराखडा असल्याचेही फडणवीस म्हणाले.
 

केजरीवालांचे शरद पवाराबद्दलचे शब्द आठवतात का?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. याचा भेटीबद्दल फडणवीस म्हणाले, अरविंद केजरीवाल काही वर्षांपूर्वी शरद पवारांना देशातील महाघाेटाळेबाज व्यक्ती म्हणाले हाेते. आता केवळ माेदींना विराेध म्हणून ते पवारांना भेटत आहेत.

 

 

Web Title: 2700 crore development plan for Pandharpur Devendra Fadnavis' announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.