सोलापुरामध्ये २ हजाराच्या नोटांमधून २७३ कोटी जमा
By दिपक दुपारगुडे | Published: September 27, 2023 07:11 PM2023-09-27T19:11:41+5:302023-09-27T19:13:42+5:30
आता केवळ दोन दिवसांची मुदत
सोलापूर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १९ मे रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली. मात्र, नोटा बदलण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, नागरिक बँकेत जाऊन नोटा बदलत आहेत.
आजवर बॅंकांमध्ये या नोटांच्या स्वरूपात सोलापूरकरांनी २७ सप्टेंबर बँकेचे कामकाज संपेपर्यंत २७३.६४ कोटी रूपये जमा केल्याची माहिती बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. वेळेत तुम्ही तुमच्याकडे असलेल्या दोन हजाराच्या नोटा बदलवून घेतल्या नाही, तर नंतर तुमच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत आणि तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागेल.
बँकेत दोन हजारांच्या नोटा जमा करण्याचे प्रमाण खूप कमी आहे, दिवसांतून एक दोन नोटा जमा करण्यासाठी येत आहेत. येत असल्याचे अग्रणी बँक चे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांनी सांगितले.