रमाई आवास योजनेतील २८ फायली गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:16 AM2021-06-29T04:16:16+5:302021-06-29T04:16:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मोहोळ : शहरातील रमाई घरकुल योजनेत मंजूर फायली गहाळ प्रकरणी शिवसेनेच्या वतीने २८ जूनपासून योजनेतील लाभार्थ्यांना ...

28 files of Ramai Awas Yojana missing | रमाई आवास योजनेतील २८ फायली गायब

रमाई आवास योजनेतील २८ फायली गायब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मोहोळ : शहरातील रमाई घरकुल योजनेत मंजूर फायली गहाळ प्रकरणी शिवसेनेच्या वतीने २८ जूनपासून योजनेतील लाभार्थ्यांना सोबत घेऊन बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

नगर परिषदेच्या रमाई आवास योजनेअंतर्गत सन २०१९- २० पात्र लाभार्थी यांच्या एकूण १८९ पैकी २८ जणांची फाइल समाजकल्याण सोलापूर कार्यालय येथे पाठविण्यात आली होती. परंतु यातील मंजूर प्रकरणातील २८ फाइली सर्व कागदपत्रे परिपूर्ण असतानादेखील गायब झाल्या. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा व लाभार्थीच्या प्रस्तावांचा शोध घेऊन त्यांना घरकुलांचा लाभ द्यावा. या मागणीसाठी अशोक गायकवाड, विजय सरवदे, सतीश क्षीरसागर यांनी २८ जूनपासून नगर परिषदेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात सुरू केले आहे. या आंदोलनाला शहर भाजपाच्या वतीने पाठिंबा जाहीर केला आहे.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोक भोसले, नगरसेविका सीमाताई पाटील, शहरप्रमुख विक्रांत देशमुख, नागेश वनकळसे, सुशील क्षीरसागर, नगरसेवक सत्यवान देशमुख, चंद्रकांत गोडसे, शिवरत्न गायकवाड, दादासाहेब पवार, सोमनाथ पवार, विनोद कांबळे, बिलाल शेख, मुजीब मुजावर, सागर लेंगरे, नागेश क्षीरसागर, अविनाश क्षीरसागर, बालाजी क्षीरसागर, आकाश क्षीरसागर, गणेश उघडे, राहुल क्षीरसागर, रोहन बनसोडे, सुशांत बनसोडे, विशाल बनसोडे, हरिभाऊ क्षीरसागर, सचिन क्षीरसागर आदी उपस्थित होते.

----

फोटो २८ मोहोळ

ओळी : मोहोळ नगर परिषदेसमोर मोहोळ शहर शिवसेनेच्या धरणे आंदोलनस्थळी शिवसेना, भाजप, पदाधिकारी व लाभार्थी.

Web Title: 28 files of Ramai Awas Yojana missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.