मास्तर तुम्ही पण; पदोन्नतीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या २९ गुरुजींची बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 12:37 PM2020-10-15T12:37:47+5:302020-10-15T12:41:14+5:30

चौकशी प्रलंबित: पदोन्नती, बदलीसाठी सादर केले बनावट प्रमाणपत्र

29 Gurus of Solapur Zilla Parishad for promotion | मास्तर तुम्ही पण; पदोन्नतीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या २९ गुरुजींची बनवाबनवी

मास्तर तुम्ही पण; पदोन्नतीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या २९ गुरुजींची बनवाबनवी

googlenewsNext
ठळक मुद्देपदोन्नतीसाठी बºयाच शिक्षकांनी कर्णबिधर असल्याचे प्रमाणपत्र सादर केलेकर्णबिधर शाबीत करण्याची चाचणी पुण्यातील ससून रुग्णालयातच होतेशिक्षकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस

सोलापूर: पदोन्नती व बदलीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाकडे असलेल्या २९ गुरुजींनी बनावट कागदपत्रांचा वापर केला आहे, असे चौकशी समितीच्या अहवालात निष्पन्न झाले आहेत. 

चौकशी समितीचा अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहाकडे सादर केला आहे.
जिल्हा परिषदेच्या १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत उमेश पाटील यांनी पदोन्नतीसाठी शिक्षकांनी कर्णबधिर असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार केली होती. यावर चौकशीचे आदेश झाले होते. त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण विभागाने ही चौकशी केली आहे. पदोन्नतीसाठी १६३ शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले होते.

या प्रमाणपत्रांची २४ जून २०१७ रोजी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तपासणी करण्यात आली आहे. यातील १२३ शिक्षकांकडे आॅनलाईन प्रमाणपत्र आहे. ३९ शिक्षकांचे प्रमाणपत्र संशयास्पद आढळले. या प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यात आली. त्यात ३२ शिक्षकांचे प्रमाणपत्र योग्य असल्याचे आढळले. 

सात शिक्षकांनी २०१६ च्या बदलीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे स्पष्ट झाले. आरोग्य विभागाच्या त्रिसदस्यीय समितीसमोर हे शिक्षक दिव्यांग नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या शिक्षकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच पुणे विभागाच्या सहायक आयुक्तांसमोर त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. 
-------------
शिक्षकांनी दिले बनावट प्रमाणपत्ऱ़़
पदोन्नतीसाठी बºयाच शिक्षकांनी कर्णबिधर असल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. कर्णबिधर शाबीत करण्याची चाचणी पुण्यातील ससून रुग्णालयातच होते. त्यामुळे अशा संशयित शिक्षकांची तपासणी करण्यात आली. यात २२ शिक्षकांचे प्रमाणपत्र बोगस आढळले आहे. त्यांच्यावरील चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही.

Web Title: 29 Gurus of Solapur Zilla Parishad for promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.