२९ वर्षांची 'राजनिष्ठा' फळाला आली; पंढरपूरच्या दिलीप बापूंना चक्क 'मनसे नेते'पदाची लॉटरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 02:32 PM2021-08-09T14:32:57+5:302021-08-09T14:34:25+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

29 years of ‘loyalty’ came to fruition; Lottery for the post of 'MNS leader' for Dilip Bapu of Pandharpur! | २९ वर्षांची 'राजनिष्ठा' फळाला आली; पंढरपूरच्या दिलीप बापूंना चक्क 'मनसे नेते'पदाची लॉटरी !

२९ वर्षांची 'राजनिष्ठा' फळाला आली; पंढरपूरच्या दिलीप बापूंना चक्क 'मनसे नेते'पदाची लॉटरी !

googlenewsNext

पंढरपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस शाडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्वोच्च अशा मनसे नेतेपदी  निवड केली. मुंबई येथील कृष्णकुंज निवासस्थानी राज ठाकरे यांनी दिलीप धोत्रे यांना निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा दिल्या.

सन १९९२-९३  साली सर्वप्रथम पंढरपूर महाविद्यालयाच्या भारतीय विद्यार्थी सेनेच्या शाखा अध्यक्षपदी दिलीप धोत्रे यांची निवड करण्यात आली होती, त्यावेळेपासून आजतागायत दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्याचे फळ त्यांना मिळाले असल्याचे सांगण्यात आले. सलग २९ वर्ष धोत्रे हे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत, कॉलेजचे शाखा अध्यक्ष ते मनसेचे नेते असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
कॉलेज अध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपतालुक अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, उपजिल्हा अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा संघटक, प्रदेश सरचिटणीस, मनसे नेते असा त्यांचा प्रवास आहे. सलग 2 वर्ष आलेल्या महाभयंकर आशा कोरोनाच्या संकटात दिलिप धोत्रे यांनी हजारो कुटुंबाना मदत केली आहे.
राज ठाकरे यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडेन. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. एकनिष्टतेचे हे फळ आहे असे धोत्रे म्हणाले. मनसे नेते पदी निवड झाल्याने धोत्रे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Web Title: 29 years of ‘loyalty’ came to fruition; Lottery for the post of 'MNS leader' for Dilip Bapu of Pandharpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.