सोलापूर : कमी किमतीत वाहनांचा विमा उतरवण्याचे आमिष दाखवल, ग्राहकांना व कंपनीला लावला ३ कोटीला चुना

By रूपेश हेळवे | Published: April 1, 2023 06:14 PM2023-04-01T18:14:49+5:302023-04-01T18:14:57+5:30

कमी किमतीत वाहनांची पॉलिसी उतरवण्याचे आमिष दाखवत ग्राहकांना व कंपनीला तीन कोटी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.  

3 crore lime to the customers and the company for luring vehicles at a low price, a case has been registered | सोलापूर : कमी किमतीत वाहनांचा विमा उतरवण्याचे आमिष दाखवल, ग्राहकांना व कंपनीला लावला ३ कोटीला चुना

सोलापूर : कमी किमतीत वाहनांचा विमा उतरवण्याचे आमिष दाखवल, ग्राहकांना व कंपनीला लावला ३ कोटीला चुना

googlenewsNext

सोलापूर - कमी किमतीत वाहनांची पॉलिसी उतरवण्याचे आमिष दाखवत ग्राहकांना व कंपनीला तीन कोटी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.  या प्रकरणी विनय रामकृष्ण मंत्री ( वय ५१) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अजय कोरवार ( रा. आदित्य नगर, विजापूर रोड), प्रदीप सावंत ( रा. डफरीन चौक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

वरील आरोपींनी २०२२ ते २०२३ या दरम्यान एका इन्शुरन्स कंपनीचे एजंट असल्याचे अनेकांना भासवले. शिवाय त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान मधील मोटार वाहन धारकांना कमी किमतीचा प्रिमियम देतो असे आमिष दाखवले. तसेच बनावट पॉलिसी काढून वाहनधारकांची व कंपनीची फसवणूक केली. यात एकूण २ कोटी ९३ लाख ६८ हजार ८३६ रुपयांची फसवणूक झाल्याबाबत मंत्री यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अजय कोरवार, प्रदीप सावंत या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: 3 crore lime to the customers and the company for luring vehicles at a low price, a case has been registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.