नातेपुतेत हस्तगत केलेले तीन लाखांचे मोबाईल पोलिसांकडून मूळ मालकांना परत

By काशिनाथ वाघमारे | Published: March 6, 2024 08:30 PM2024-03-06T20:30:53+5:302024-03-06T20:31:14+5:30

सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

3 lakh mobile phones seized from relatives returned to original owners by police | नातेपुतेत हस्तगत केलेले तीन लाखांचे मोबाईल पोलिसांकडून मूळ मालकांना परत

नातेपुतेत हस्तगत केलेले तीन लाखांचे मोबाईल पोलिसांकडून मूळ मालकांना परत

सोलापूर : नातेपुते पोलिस स्टेशन हद्दीत चोरीला गेलेले २ लाख ९०, ४९० रुपयांचे १२ मोबाईल हस्तगत करुन मूळ मालकांना परत केले. सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 काही दिवसांपूर्वी मोबाईल चोरिला गेल्याप्रकरणी नातेपुते पोलिस स्टेशनमध्ये मदनकुमार जोशी (रा. नातेपुते) यांनी फिर्याद दिली होती. याचा तपास करून आरोपी उमेश पोपट लोंढे (रा.बरड, ता. फलटण, जि. सातारा) यास ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीचे १२ मोबाईल जप्त केले. यापूर्वी बाजारतळ, शहर, ग्रामीण भागातून मोबाईल चोरीच्या तक्रारी आल्या होत्या. सायबर सेलच्या मदतीने तपास करून उमेश लोंढे याला ताब्यात घेत त्याच्याकडून १२ मोबाईल जप्त केले. पोलिस निरीक्षक विकास दिंडोरे, ए.स,आय.गडदे, पोलिस काॅस्टेबल रणजित मदने, शिवानंद सोनवणे, संतोष वारे, गणेश कापसे, प्रमोद तोरणे, सचिन राठोड यांनी सायबर सेलच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली.

जप्त केलेले मोबाईल हँडसेट अमोल माने, शंकस गूट्टे, बापू गोरे, प्रताप कूभांर, विजय देवकूळे, अनिता खंडागळे, प्रतिक्षा बोडखे, प्रवीण भिसे, बाळू मारकड, शूभम इंगळे, मनोज यादव, समिर आद्रट या मूळमालकांना परत केले.

Web Title: 3 lakh mobile phones seized from relatives returned to original owners by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.