उजनीच्या कालव्यातून साेलापूरसह शेतकऱ्यांना जूनअखेर आणखी तीन आवर्तने देणार

By राकेश कदम | Published: March 5, 2023 06:35 PM2023-03-05T18:35:54+5:302023-03-05T18:37:17+5:30

पालकमंत्र्यांची ग्वाही: उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक

3 more rotations will be given to the farmers from ujani canal along with solapur by the end of june | उजनीच्या कालव्यातून साेलापूरसह शेतकऱ्यांना जूनअखेर आणखी तीन आवर्तने देणार

उजनीच्या कालव्यातून साेलापूरसह शेतकऱ्यांना जूनअखेर आणखी तीन आवर्तने देणार

googlenewsNext

राकेश कदम, सोलापूर : शहराचा पाणी पुरवठा आणि सिंचनासाठी उजनी धरणातून मार्च ते जून या कालावधीत आजवर दाेन आवर्तने दिली जात हाेती. यावर्षी जूनअखेर कालवे, भीमा नदीत तीनवेळा पाणी साेडले जाेडले जाईल. जलसंपदा अधिकाऱ्यांनी पाणीचाेरी राेखण्यासाठी नियाेजन करावे, असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी दिले.

उन्हाळी हंगामासाठी उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक रविवारी झाली. यावेळी ते बाेलत हाेते. आमदार सुभाष देशमुख, संजयमामा शिंदे, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते.विखे पाटील म्हणाले, पाणीपट्टी वसुलीसंदर्भात साखर कारखानदारांनी सहकार्य करावे. तसेच, उन्हाळी आवर्तनाच्या पहिल्या १० दिवसात दररोज २० तास वीजपुरवठा बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, महावितरण, महानगरपालिका व अन्य संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन कार्यवाही करावी. कर्नाटक राज्यात वीजपुरवठ्यामुळे अवैध पाणीउपसा होण्याची शक्यता लक्षात घेऊन, तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तेथेही वीजपुरवठा बंद ठेवण्याची कार्यवाही करावी. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणने अन्य शासकीय यंत्रणांची पूर्ण मदत घ्यावी. आवश्यक तेथे पोलीस संरक्षण घ्यावे.

माढा, माेहाेळ भागात पाणी चाेरी थांबणार

भीमा नदी आणि कालव्यातून पाणी साेडल्यानंतर माढा, माेहाेळ तालुक्यात पाण्याचा बेसुमार उपसा हाेताे. त्यामुळे खालच्या भागाला पाणी मिळत नाही. जलसंपदाची यंत्रणा ही पाणी चाेरी राेखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 3 more rotations will be given to the farmers from ujani canal along with solapur by the end of june

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.