महाराष्ट्रातील बालकांना कर्नाटकातील 'गिफ्ट एबल' देणार ३० लाखांची श्रवणयंत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:21 AM2021-02-12T04:21:04+5:302021-02-12T04:21:04+5:30
: कर्णबधिर बालकांच्या समस्येवर कार्य करणाऱ्या शेटफळ ता. मोहोळ येथील बोलवाडी प्रकल्पाला आता कर्नाटकातील गिफ्ट एबलतर्फे ३० लाख रुपयांची ...
: कर्णबधिर बालकांच्या समस्येवर कार्य करणाऱ्या शेटफळ ता. मोहोळ येथील बोलवाडी प्रकल्पाला आता कर्नाटकातील गिफ्ट एबलतर्फे ३० लाख रुपयांची श्रवणयंत्रे देणार असल्याची घोषणा गिफ्ट एबलचे समन्वयक देवदास निराकार यांनी केली.
प्रिसिजन कंपनी सोलापूर व शेटफळ येथील बोलवाडी प्रकल्पाच्यावतीने घेतलेल्या ताटवाटी चाचणी उपक्रमातील झेडपी शाळा व अंगणवाड्यांमधून शिकत असलेल्या बालकांना
शेटफळ येथील व्हाईस ऑफ व्हाईसलेसच्या पालक मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सुभाष वेदपाठक, व्हाईसलेसच्या अध्यक्षा जयप्रदा भांगे, सदस्य विश्वनाथ नकाते, योगेशकुमार भांगे, केतकी पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका पवार, सेविका थोरात उपस्थित होते. योगेशकुमार भांगे यांनी सूत्रसंचालन केले तर केतकी पाटील यांनी आभार मानले.
अशी आहेत ही साधने
'गिफ्ट एबल' देऊ करत असलेली श्रवणयंत्रे नामवंत कंपनीची व १६ चॅनल्सची असतील. ही श्रवणयंत्रे बालकांना देताना संपूर्ण प्रोग्रामिंग करून मिळतील. सोबत त्यासाठी लागणारे मोल्ड देखील देण्यात येतील. या श्रवणयंत्रांत बिघाड झाला तर सलग वर्षभर त्याची मोफत दुरुस्ती सेवा पुरवण्यात येणार आहे. ही यंत्रे बसवल्यावर आईच शिकवेल आईला या उद्देशानुसार बोलवाडी परिवारातील यशस्वी माताच पुढील मातांना व बालकांना शिकवणार आहेत.
फोटो
११वडवळ०१
ओळी
शेटफळ ता. मोहोळ येथील बोलवाडी प्रकल्प येथे पालकांशी संवाद साधताना बंगळरू येथील 'गिफ्ट एबल' चे समन्वयक देवदास निराकार. त्याप्रसंगी सुभाष वेदपाठक, जयप्रदा भांगे, विश्वनाथ नकाते, पवार, थोरात आदी.