निवडणुकीमुळे ग्रामपंचायतींचा ३० लाखाचा कर झाला वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:16 AM2021-01-10T04:16:38+5:302021-01-10T04:16:38+5:30
ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी ग्रामपंचायतीची येणेबाकी नसल्याचा दाखला जोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येकाला ग्रामपंचायतीचा संपूर्ण कर(घरपट्टी व पाणीपट्टी) ...
ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी ग्रामपंचायतीची येणेबाकी नसल्याचा दाखला जोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येकाला ग्रामपंचायतीचा संपूर्ण कर(घरपट्टी व पाणीपट्टी) भरणे आवश्यक आहे. उत्तर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ७५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या सर्व उमेदवारांनी ३० लाख २४ हजार ५५२ रुपये इतकी रक्कम ग्रामपंचायतीला कर म्हणून भरली आहे. यामध्ये कोंडी ग्रामपंचायतीला ३ लाख ३३ हजार ५८९ रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. वांगी ग्रामपंचायतीची २४ हजार ४०० रुपये, वडाळा ग्रामपंचायत एक लाख ५८ हजार, तिर्हे एक लाख ८३ हजार २३६ रुपये, तेलगाव ५४ हजार, सेवालालनगर एक लाख ४० हजार, साखरेवाडी ३० हजार रुपये, राळेरास ४९ हजार, पाथरी ५४ हजार, पडसाळी ७० हजार, नान्नज एक लाख ९८ हजार, खेड दोन लाख ७८ हजार, कळमण दोन लाख ३० हजार, होनसळ ९५ हजार रुपये इतका वसूल झाला आहे.
हिरज एक लाख, तळेहिप्परगा एक लाख २० हजार, हगलूर ७४ हजार,गुळवंची ७० हजार, एकरुख- तरटगाव ८५ हजार, बीबीदारफळ दोन लाख ८७ हजार, भोगाव एक लाख ४७ हजार, भागाईवाडी २७, ३२७ रुपये, बेलाटी एक लाख २७ हजार व बाणेगाव ९० हजार रुपये इतका वसूल झाला आहे.
------ऑनलाईनमुळे लागली शिस्त
बीबीदारफळसह इतर ग्रामपंचायते दप्तर अद्यावत करण्यात आले आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या नोंद प्रमाणे कर वसूल करणे बंधनकारक आहे. यामध्ये काही बदल किंवा कमी-अधिक रक्कम करता येत नाही. याशिवाय जमा झालेली रक्कम त्याच दिवशी बॅंंकेत जमा करणे बंधनकारक आहे.
-----