माढा ग्रामीण रुग्णालयात ३० वाफेचे मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:17 AM2021-06-04T04:17:57+5:302021-06-04T04:17:57+5:30
माढा : पुणे विभागाचे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतून माढा ग्रामीण रुग्णालय येथे ३० वाफेची मशीन देण्यात ...
माढा : पुणे विभागाचे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतून माढा ग्रामीण रुग्णालय येथे ३० वाफेची मशीन देण्यात आली.
माढा येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांसाठी प्रभाकर देशमुख युवा मंचचे अध्यक्ष अध्यक्ष प्रसाद भास्करे यांच्या पुढाकारातून या मशीन देण्यात आल्या.
माढा येथे महिन्याभरापूर्वी तीस ऑक्सिजन बेडचे डीसीएचसी सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी उपचारानंतर शंभराहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असलेल्या या रुग्णालयाचा सामान्यांना मोठा फायदा झाला आहे. या ठिकाणी रुग्णांना वाफ देण्यासाठी प्रसाद भास्करे यांनी या सरकारी रुग्णालयास मशीन भेट दिल्या.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डाॅ. सदानंद व्हनकळस, ए. एम. जाधवर, शहारे, गणेश पवार, श्रीकांत कुलकर्णी, प्रशांत कांबळे, साखरे आदी उपस्थित होते.
---
फोटो : ०२ माढा
प्रभाकर देशमुख युवा मंचच्या वतीने माढा येथील ग्रामीण रुग्णालयास स्टीमर मशीन वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सदानंद व्हनकळस यांच्याकडे सुपूर्द करताना प्रसाद भास्करे, गणेश पवार.
----