रिक्षातून वाहतूक करताना ३० हजारांची दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:26 AM2021-09-06T04:26:52+5:302021-09-06T04:26:52+5:30

बार्शी : देशी विदेशी दारूच्या बाटल्याची बार्शी विनापरवाना वाहतूक रिक्षातून करत असताना बार्शी शहर पोलिसांनी धाड टाकून ...

30,000 worth of liquor was seized while transporting the rickshaw | रिक्षातून वाहतूक करताना ३० हजारांची दारू पकडली

रिक्षातून वाहतूक करताना ३० हजारांची दारू पकडली

Next

बार्शी : देशी विदेशी दारूच्या बाटल्याची बार्शी विनापरवाना वाहतूक रिक्षातून करत असताना बार्शी शहर पोलिसांनी धाड टाकून पोलिसांनी ३० हजारांची दारू जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

रविवारी दुपारी शहरातील पोस्ट चौक-शिवाजी आखाडा दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत पोलीस नाईक शिवाजी बळिराम कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी वैभव चंद्रकांत पिसे व रिक्षाचालक अनिल रामचंद्र दबडे (४३़, रा. नाळे प्लॉट) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी दुपारी रिक्षाचालक हा बसस्थानक चौकातील पिसे यांच्या एस.पी.वाइन शॉपमध्ये आला. वाहतूक परवाना नसताना त्याने वाऊन शॉपमधून देशी विदेशी दारुच्या बाटल्या भरलेले बॉक्स रिक्षा (एम.एच. १३ / बी. व्ही. ०८५५) यात भरून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ती रिक्षा अडवून तपासणी करता देशी-विदेशी दारूचे बॉक्स आढळले. या बॉक्समधून २१७ बाटल्या जप्त केल्या. अधिक तपास फौजदार ज्ञानेश्वर उदार करत आहेत.

Web Title: 30,000 worth of liquor was seized while transporting the rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.