आर्यन शुगरसह ३० बिगरशेतीचे आदेश रद्द, बार्शी तहसीलदारांचे आदेश प्रांताधिकाºयांकडून रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:17 PM2018-01-31T12:17:09+5:302018-01-31T12:18:36+5:30
बिनशेतीचे आदेश देताना नगररचना विभागाकडून रेखांकन मंजुरीबाबत अभिप्राय न घेतल्याचा ठपका ठेवून प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी बार्शी तालुक्यातील आर्यन शुगरसह ३० जणांना दिलेले बिनशेती आदेश रद्द केले आहेत.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३१ : बिनशेतीचे आदेश देताना नगररचना विभागाकडून रेखांकन मंजुरीबाबत अभिप्राय न घेतल्याचा ठपका ठेवून प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी बार्शी तालुक्यातील आर्यन शुगरसह ३० जणांना दिलेले बिनशेती आदेश रद्द केले आहेत. तहसीलदारांनी या प्रकरणात दिलेले आदेश अवैध आहेत, असा शेराही प्रांताधिकाºयांनी नोंदविला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून २०१२ च्या दरम्यान देण्यात आलेले अनेक बिनशेती आदेश वादाच्या भोवºयात अडकलेले आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी अशा अनेक आदेशांची पोलखोल केली होती. यात जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी, कर्मचारी अडकलेले आहेत. बार्शी आणि उत्तर सोलापूरचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांच्याकडे अशा प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. यातही बार्शी तालुक्यातील ३० प्रकरणात सुनावणी घेण्यात आली. प्रतिवादींना संधी देण्यात आली. यात अनेकांनी म्हणणे मांडलेही नाही. अनेक जमिनींना अकृषकची परवानगी देताना जमिनीची मोजणी करण्यात आली नसल्याचा शेराही मारण्यात आला आहे. शिवाय सहायक संचालक नगररचना विभागाचा अभिप्रायही घेण्यात आला नसल्याचे नमूद केले आहे. यातील आदेश रद्द करुन अकृषक आदेशापूर्वीचा ७/१२ सध्याच्या मालकी हक्क असणाºया व्यक्तीच्या नावे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.
--------------------
यांचे आदेश रद्द...
- संदीप मस्तुद (उपळाई ठोंगे), साहेबराव पाटील व इतर (रंतजन), सिध्देश्वर मुंबरे (मळेगाव), जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे अनिल सावंत (अलिपूर), श्रीनिवास पतंगे व इतर (बळेवाडी), प्रभाकर पाटील (खामगाव), नितीन व सौदागर नवगिरे (गाताचीवाडी), श्रीनिवास पतंगे व इतर (गाडेगाव), कपिल मौलवी व इतर (गाडेगाव), रावसाहेब जाधव (तांदूळवाडी), संजयकुमार खेंदाड (सासुरे), संजय गाला (दडशिंगे), तानाजी पवार व इतर (उपळाई ठोंगे), रवींद राऊत व इतर (गाताचीवाडी), अरुण ताटे व इतर (मानेगाव), कांतीलाल मांडोत (खांडवी), आप्पासाहेब गावसाने (सौंदरे), शिवप्रभू धतुरगाव (सौंदरे), पांडुरंग इंगळे (सौंदरे), प्रशांत शेटे (मानेगाव), दत्तात्रय सोनवणे (जामगाव आ), आर्यन शुगर (खामगाव), रणजित देशमुख (रातंजन), किसन राक्षे (खांडवी), सीमा दसंगे (जामगाव आ), संजय चित्राव (जामगाव आ), आनंदराव जगदाळे (उपळाई ठों), अलका साळुंखे व इतर (अलिपूर), लक्ष्मीबाई, रामचंद्र, सतीश जाधव (अलिपूर), चंद्रसेन ढेंगळे (मानेगाव).
----------------
जिल्हाधिकाºयांकडून अपेक्षा
- सोलापुरात बोगस बिनशेतीची अनेक प्रकरणे उघडकीस आली. परंतु, ती दाबण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे.