सहा महिन्यात रेल्वे तिकिटांची दलाली करणाऱ्या ३१७ जणांना अटक

By रूपेश हेळवे | Published: November 12, 2023 12:24 PM2023-11-12T12:24:26+5:302023-11-12T12:26:12+5:30

मध्य रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई : सोलापुरातून आठ जणांना अटक

317 people arrested for brokering railway tickets in six months solapur 8 people arrested | सहा महिन्यात रेल्वे तिकिटांची दलाली करणाऱ्या ३१७ जणांना अटक

सहा महिन्यात रेल्वे तिकिटांची दलाली करणाऱ्या ३१७ जणांना अटक

रुपेश हेळवे, सोलापूर :मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे आरक्षित तिकिटांचे काळाबाजार करणार्या दलालांविरुद्धची मोहीम तीव्र केली आहे. यात सायबर सेलकडून मिळालेल्या डेटा आणि इतर इनपुटच्या आधारे मध्य रेल्वेचे आरपीएफ पथक छापे टाकत आहे. रेल्वे पोलिसांनी एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये २६९ गुन्हे दाखल झाले आहेत. यात ३१७ जणांना अटक केली आहे. सोलापूर विभागात ८ गुन्हे दाखल करून ८ जणांना अटक करण्यात आली.

या सर्वांवर रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३ लाख ४२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. या २६९ प्रकरणांपैकी २३ एप्रिल ते ऑक्टोबर या चालू वर्षात सोलापूर विभागात ८ गुन्हे दाखल करून ८ जणांना अटक करण्यात आली. तर या प्रकरणी एकट्या मुंबई विभागात ९७ गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत ११७ जणांना अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ भुसावळ विभागात ७२ गुन्हे दाखल झाले असून ७७ जणांना अवैध धंदे प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुणे विभागातील आरपीएफने ५६ गुन्हे दाखल करून ७४ जणांना अटक केली, नागपूर विभागात ३६ गुन्ह्यांसह ४१ जणांना अटक केली.

Web Title: 317 people arrested for brokering railway tickets in six months solapur 8 people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.