राजकीय पक्षांच्या सभांसाठी सोलापुरातील पार्क स्टेडियमसह ३२ पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:27 AM2019-03-25T10:27:37+5:302019-03-25T10:29:14+5:30
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान होणाºया राजकीय पक्षांच्या जाहीर सभांसाठी महापालिकेने शहरातील ३२ जागा निश्चित केल्या आहेत. यामध्ये पार्क ...
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान होणाºया राजकीय पक्षांच्या जाहीर सभांसाठी महापालिकेने शहरातील ३२ जागा निश्चित केल्या आहेत. यामध्ये पार्क स्टेडियमचाही समावेश आहे.
महापालिकेच्या मालकीच्या जागांची यादी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे देण्यात आली होती. पोलीस प्रशासनाची चर्चा करून निवडणूक कार्यालयाने या जागा निश्चित केल्या आहेत. यामध्ये सावरकर मैदान (आसार मैदान), मजरेवाडी शाळा, नेहरूनगर क्रीडांगण, सेटलमेंट समाज मंदिर, पुंजाल मैदान शांती चौक, हुडको क्र. ३ क्रीडांगण, दाजी पेठ क्रीडांगण, जयभवानी प्रशाला, चिल्ड्रन पार्क लगत असलेली खुली जागा कर्णिक नगर, जुनी मिल कपाउंड लक्ष्मी पेठ, कर्णिक नगर- फुटबॉल मैदान, पार्क स्टेडियम, संभाजी तलाव लगत असलेली राणी लक्ष्मीबाई खुली जागा, भैय्या चौक, कन्ना चौक, जुळे सोलापूर चौक, महावीर चौक, बाळीवेस चौक, जगदंबा चौक, विजापूर वेस चौक, नई जिंदगी चौक, सलगर वस्ती चौक, बेडरपूल चौक, कुमठा नाका चौक, जिल्हा परिषद गेट चौक, माधव नगर चौक, विडी घरकूल चौक, दत्त नगर चौक, मिलिंद नगर चौक, सम्राट चौक, दयानंद कॉलेज चौक, शेळगी चौक.
यंदा होम मैदान नाहीच
- शहरातील होम मैदान हा जाहीर सभांसाठी सर्वाेत्तम पर्याय होता. या मैदानावर एखाद्या पक्षाची दमदार सभा झाली की मतदारसंघातील वातावरण त्याच पक्षाच्या दिशेने वाहत असल्याचे अनेकदा दिसून आले. यंदा स्मार्ट सिटी योजनेतून होम मैदानाचे सुशोभीकरण झाले आहे. गड्डा यात्रा वगळता इतर काळात मैदानावर वाहने आणण्यास मनाई आहे. राजकीय सभांसाठी हे मैदान उपलब्ध नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.