पंढरपूर तालुक्यात ३३ उमेदवारांचे अर्ज बाद; ३३०० उमेदवार निवडणुकीसाठी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:18 AM2021-01-02T04:18:43+5:302021-01-02T04:18:43+5:30
७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तालुक्यातून विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. त्या अर्जावर हरकती घेण्यासाठी गुरुवारी एक दिवसाची मुदत दिली होती. ...
७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तालुक्यातून विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. त्या अर्जावर हरकती घेण्यासाठी गुरुवारी एक दिवसाची मुदत दिली होती. त्यासाठी सर्वच इच्छुक उमेदवार विरोधी उमेवारांचा अर्ज हरकती घेऊन बाद करण्यासाठी आले होते. मात्र नुसती हरकत ऐकून घेतली जाणार नाही तर त्यासाठी पुरावे असतील तरच हरकत घ्यावी, असा पवित्रा निवडणूक विभागाने घेतल्याने अनेकजण माघारी परतले. तरीही छाननीची प्रक्रिया रात्री ७ वाजेपर्यंत सुरू होती.
नामंजूर झालेल्या अर्जामध्ये सोनके २, आणवली १, कासेगाव २, खर्डी १, तपकिरी शेतफळ १, आजनसोड १, सुस्ते ३, उंबरे ३, करोळे २, पेहे १, सांगवी १, भाळवणी २, उपरी १, सुपली १, पळशी १, भोसे १, पटवर्धन कुरोली ३, आंबे २, सरकोली १, ओझवाडी १, वाखरी २ आदी २१ गावांमधील ३३ जणांचे उमेदवारी अर्ज, आवश्यक कागदपत्रे, वय आदी कारणास्तव नामंजूर करण्यात आले. आता पात्र उमेदवारांना ५ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्याच दिवशी चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.