सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफी खातेदारांना देण्यास ३३ कोटी रुपयांची कमतरता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:26 AM2017-12-12T10:26:56+5:302017-12-12T10:29:08+5:30
राज्य शासनाने दिलेल्या कर्जमाफीच्या यादीतील पात्र शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेला ३३ कोटी ७७ लाख ९९ हजार ९९३ रुपये इतकी रक्कम अपुरी आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १२ : राज्य शासनाने दिलेल्या कर्जमाफीच्या यादीतील पात्र शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेला ३३ कोटी ७७ लाख ९९ हजार ९९३ रुपये इतकी रक्कम अपुरी आहे. दीड लाखावरील खातेदारांच्या रकमेचा विषय वेगळाच असल्याचे सांगण्यात आले.
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेला आतापर्यंत ८१ हजार ८९६ शेतकºयांची यादी आली आहे. या शेतकºयांसाठी बँकेच्या माहितीप्रमाणे ३०९ कोटी ३९ लाख ५६ हजार १९३ रुपयांची आवश्यकता आहे, परंतु शासनाने २७५ कोटी ६१ लाख ६४ हजार २०० रुपये दिले आहेत. शासनाने दिलेल्या यादीपैकी ६० हजार १३८ शेतकºयांची कर्जाबाबतची तपासणी केल्यानंतर ४६ हजार ४७ शेतकºयांची माहिती बरोबर आढळली तर १४ हजार ९१ शेतकºयांच्या नावात व रकमेत चुका आढळल्या आहेत. यामध्ये दीड लाखावरील खातेदारांची संख्या २१ हजार ७५८ इतकी आहे.
राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात आलेल्या ३० लाभार्थ्यांपैकी २४ शेतकºयांच्या खात्यावर १२ लाख ३९ हजार ९३ रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर दोनवेळा आलेल्या यादीतील ४४ हजार ७४० शेतकºयांच्या कर्ज खात्यावर २२७ कोटी ४८ लाख ७५ हजार ५६० रुपये बँकेने जमा केले असल्याचे सांगण्यात आले. तपासणीत त्रुटी आढळलेल्या शेतकºयांची यादी शासनाकडे पाठविण्यात आली असून, शासनाकडून दुरुस्तीची यादी आल्यानंतर बँकेकडे शिल्लक असलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. शासनाकडून आलेल्यापैकी तपासणी करून बरोबर असलेल्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी ३३ कोटी ७७ लाख ९९ हजार ९९३ रुपयांची गरज आहे. याशिवाय उर्वरित आॅनलाईन अर्ज भरलेल्या शेतकºयांची यादी व पैसे शासनाकडून आलेली नसल्याचे सांगण्यात आले.
------------------------
४४ हजार ७६६ शेतकरी कर्जमुक्त
- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आतापर्यंत आलेल्या २७५ कोटी ६१ लाख ६४ हजार २०० रुपयांपैकी २२७ कोटी ६१ लाख १४ हजार ६५३ रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले.
- ६० हजार १३८ शेतकºयांच्या यादी तपासणीत १४ हजार ९१ शेतकºयांच्या नावात निघाल्या दुरुस्त्या.
- बँकेच्या एकूणच एक लाख २३ हजार ७५४ खातेदारांची माहिती शासनाला पाठवली होती, त्यापैकी ४४ हजार ७६६ शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा झाली.
- दीड लाखावरील रक्कम जे शेतकरी भरणा करतील त्यांची माहिती व रक्कम शासनाकडे मागणी केली जाणार आहे. शासनाकडून रक्कम आल्यानंतरच खात्यावर जमा होणार आहे.
---------------------
शासनाकडून आलेली रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा केली आहे. शिल्लक असलेली रक्कमही दुरुस्त यादीसाठी आवश्यक आहे. तपासणी केलेल्या यादीतील पात्र शेतकºयांसाठीही रक्कम अपुरी पडते. आणखीन किमान १०० कोटींची आवश्यकता आहे.
- राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा बँक