बार्शीत तीन दिवसात ३४० नवे कोरोना बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:22 AM2021-05-13T04:22:57+5:302021-05-13T04:22:57+5:30

बार्शी: कोरोनाबाधितांची संख्या तालुक्यात वाढत आहेत. याची टक्केवारीही जास्त आहे. शहरात संख्या थोडी कमी असली तरी ग्रामीण भागात ...

340 new corona infected patients in three days in Barshi | बार्शीत तीन दिवसात ३४० नवे कोरोना बाधित रुग्ण

बार्शीत तीन दिवसात ३४० नवे कोरोना बाधित रुग्ण

Next

बार्शी: कोरोनाबाधितांची संख्या तालुक्यात वाढत आहेत. याची टक्केवारीही जास्त आहे. शहरात संख्या थोडी कमी असली तरी ग्रामीण भागात मात्र रुग्णसंख्या वाढत आहे. मागील आठ ते दहा दिवसापासून चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामूक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. ३९३ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. दुसरीकडे १४ जणांचा मृत्यू झाला ही चिंतेची बाब आहे.

आजमितीला बार्शी तालुक्यात एकूण ३४० बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. बार्शी शहरात ९७ तर ग्रामीण भागात २९३ रुग्ण असल्याची माहिती तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी दिली. तीन दिवसात २३३३ जणांच्या रॅपिड व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत.

शहरात १२२७ तर ग्रामीण भागात १६३८ जणांच्या चाचणी करण्यात आल्या. आता डेडिकेटेड कोविड सेंटर आणि हॉस्पिटलची संख्या देखील वाढली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये एच आर सिटी स्कोअर जास्त आढळून येत आहे. गेल्या काही दिवसात मृत्यूची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या घटलेली असली तरी चाचण्यांचे प्रमाणही निम्म्याहून कमी झाले आहे. रॅपिड अँटिजेंन कीटचाही तुटवडा आहे. ऑक्सिजन देखील अद्याप पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही.

Web Title: 340 new corona infected patients in three days in Barshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.