बनावट फळबाग विम्याची ३,४०४ प्रकरणे आढळली; लोण पाेहोचले राज्यातील २४ जिल्ह्यांत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 08:09 AM2023-02-27T08:09:02+5:302023-02-27T08:09:46+5:30

अंबिया बहार फळपिकांचा बनावट शेतकऱ्यांकडून भाडेकरार जमीन दाखवून, तसेच फळपीक नसताना विमा उतरल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते.

3,404 cases of bogus orchard insurance detected; in 24 districts of the state | बनावट फळबाग विम्याची ३,४०४ प्रकरणे आढळली; लोण पाेहोचले राज्यातील २४ जिल्ह्यांत

बनावट फळबाग विम्याची ३,४०४ प्रकरणे आढळली; लोण पाेहोचले राज्यातील २४ जिल्ह्यांत

googlenewsNext

- अरुण बारसकर
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : बनावट विमामाफियांच्या दबावामुळे तपासणीत येणारे अडथळे पार करीत कृषी खाते धाडसाने फळपिकांची तपासणी करीत आहे. राज्यात आतापर्यंत फळबागा नसताना विमा भरलेली ३,४०४ बनावट प्रकरणे आढळून आली आहेत.

अंबिया बहार फळपिकांचा बनावट शेतकऱ्यांकडून भाडेकरार जमीन दाखवून, तसेच फळपीक नसताना विमा उतरल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. कृषी खात्याकडून याची गंभीर दखल घेत केंद्र सरकारला पत्र दिले होते. राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी या प्रकरणाची संपूर्ण तपासणीचे आदेश दिले असतानाच, केंद्रीय कृषी सचिवांनीही राज्याला तपासणीचे पत्र दिले होते. राज्यभरात सुरू असलेल्या तपासणीत आतापर्यंत ३,४०४ बनावट प्रकरणे उघडकीस आली आहेत.
बनावट पीकविम्याचे लोण राज्यातील २४ जिल्ह्यांत असल्याचे आतापर्यंत आढळले असून, तपासणी अद्याप सुरूच असल्याचे सांगण्यात आले.
यावर्षी राज्यात दोन लाख ४८ हजार ९२३ शेतकऱ्यांकडून फळपीकविमा भरला आहे. संपूर्ण फळबागांची कृषी सहायक, तलाठी व विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात 
येत आहे. आतापर्यंत राज्यात अवघ्या ५२ हजार हेक्टरची तपासणी 
झाली आहे.

विमा कंपनीचेही लोक सहभागी?
२०२१-२२ या वर्षीही असे प्रकार झाले. मात्र, सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाले आहेत. विमा कंपनीच्या काही लोकांना याची कल्पना होती. मात्र, त्यांनी गप्प राहण्याचे काम केले. त्याला कृषी खात्याकडूनही बळ मिळाले

जिल्हा    एकूण    तपास    अपात्र
    अर्ज     अर्ज    अर्ज
अहमदनगर    २३०५    ८१४    ३१
धुळे    २५०८    ८४२    २१
नागपूर    ६५७    ५९१    ८
नाशिक    १०९३    ९३८    १२
सोलापूर    ४४१५    ८०९    ४७०
वाशिम    १३    १३    ९
यवतमाळ    १९३    १९३    २
पालघर    ३४२९    ७१४    ५
नंदुरबार    १७०४    ३५४    ३८
रत्नागिरी    ३२३८    ३२४३    ७०
सिंधुदुर्ग    ३८४६४    २५९३    १७
अमरावती    ३६०३    ४०६    ४
संभाजीनगर    ३६५२    १०५०    ९६
जालना    ४७६८६    १०९५०    ११०५
कोल्हापूर    २७९    २७९    ४७
लातूर    ५३३    ५३३    ६
सांगली    ७०७०    २६८२    ७४४
सातारा    ५९९    ५९९    ५०
ठाणे    ४७८८    ९८७    १९
बीड    २३६९    ९७८    २०
जळगाव    ७८४३०    ११८९९    ४११
नांदेड    ११८३    ८३६    ५१
धाराशीव    ६२४    ६२४    १६
पुणे    ४३९    ४३९    २२२
एकूण २,४८,९२३  ५२,०८६  ३४०४

Web Title: 3,404 cases of bogus orchard insurance detected; in 24 districts of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.