प्रधानमंत्री आवास योजनेतून ३,४५३ घरकुले मंजूर!

By admin | Published: May 6, 2017 07:28 PM2017-05-06T19:28:35+5:302017-05-06T19:28:35+5:30

आतापर्यंत ३ हजार ४५३ घरकुलांना मंजूरी देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शनिवारी कळविली.

3,453 houses sanctioned from Pradhan Mantri Awas Yojana! | प्रधानमंत्री आवास योजनेतून ३,४५३ घरकुले मंजूर!

प्रधानमंत्री आवास योजनेतून ३,४५३ घरकुले मंजूर!

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : सोलापूर ग्रामीण पोलीस दलात अप्पर पोलीस अधिक्षकपदी मिलिंद लालासाहेब मोहिते हे शनिवारी रूजू झाले़ दरम्यान, पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी त्याचे स्वागत केले़ राज्याच्या गृहविभागाने राज्यातील पोलीस उपायुक्त, उपअधिक्षक, पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या़ अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांची नाशिक येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मिलिंद मोहिते यांनी अप्पर पोलीस अधिक्षक पदाची सुत्रे हाती घेतली़ मिलिंद मोहिते यांचा जन्म सांगली येथे झाला़ त्यांनी यापुर्वी पुणे ग्रामीण, पुणे शहर त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे सेवा बजावली आहे़ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबरोबरच पोलीस व नागरिक यांच्यात सुसंवादावर जास्तीचा भर देण्यावर माझा प्रयत्न राहील असे मत मिलिंद मोहिते यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले़

Web Title: 3,453 houses sanctioned from Pradhan Mantri Awas Yojana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.