कत्तलीसाठी नेणाऱ्या ३५ गायींना पोलिसांच्या मदतीनं जीवदान

By विलास जळकोटकर | Published: April 3, 2023 05:48 PM2023-04-03T17:48:33+5:302023-04-03T17:48:45+5:30

कत्तलीसाठी वाहतूक केल्या जाणाऱ्या वाहनाचा पोलिसांच्या मदतीने पाठलाग करुन ३५ गायींची सुटका

35 cows taken for slaughter were saved with the help of police | कत्तलीसाठी नेणाऱ्या ३५ गायींना पोलिसांच्या मदतीनं जीवदान

कत्तलीसाठी नेणाऱ्या ३५ गायींना पोलिसांच्या मदतीनं जीवदान

googlenewsNext

सोलापूर :

कत्तलीसाठी वाहतूक केल्या जाणाऱ्या वाहनाचा पोलिसांच्या मदतीने पाठलाग करुन ३५ गायींची सुटका रविवारी रात्री करण्यात आली. कुर्डूवाडी येथे ही कारवाई करण्यात येऊन वाहन ताब्यात घेण्यात आले. पंढरपुरातही अशीच कारवाई करण्यात आली. विहिंप आणि बजरंग दलाच्या गोरक्षा विभागानं यासाठी मदत केली.

रविवारच्या रात्री विश्वहिंदू परिषद बजरंग दल गोरक्षा विभागाचे जिल्हाप्रमुख प्रशांत प्रेमचंद परदेशी यांना गुप्त माहितीनुसार दोन ठिकाणी पुढाकार घेऊन  पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. त्यापैकी पहिल्या कारवाईत  एम एच १३ सी जे ०८९४ या वाहनातून गायींची तस्करी करीत असलेले वाहन कुर्डूवाडी येथे पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले. त्यातील ३५ गोवंशाना कत्तलीपासून जीवनदान देण्यात आले. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका येथील मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांच्या मदतीने कत्तलखान्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी एक मिनी आयशर एम. एच. १३ क्यू ७३९३ हे वाहन गोमासाने गच्च भरलेल्या स्थितीत ताब्यात घेण्यात आले. 

१३ गायींना दाटीवाटीनं कोंबून वाहतूक

याच दिवशी  पंढरपूर येथे रात्री ११ वाजताच्या दरम्यान एक आयशर क्रमांक एम एच १३ आर २३६२ वाहनात १३ गायींना दाटीवाटीने कोंबून त्यांचे तोंड व चारही पाय दोरखंडाने बांधलेल्या अवस्थेत निदर्शनास आले. हे गोवंश कत्तलीच्या उद्देशाने नेत असताना या वाहनास पकडण्यात आल्याचे विश्वहिंदू परिषद बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख गोरक्षक प्रशांत परदेशी यांनी दिली. पंढरपूर येथील कारवाई यशस्वी करण्याकरिता पुणे येथील गोरक्षक शिवशंकर स्वामी (मानद पशु कल्याण अधिकारी) विश्वहिंदू परिषद बजरंग दल जिल्हाप्रमुख गोरक्षा विभाग सोलापूरचे प्रशांत परदेशी, उपजिल्हाप्रमुख योगीराज जडगोणार, गोरक्षक प्रतीक भेगडे,पवनकुमार कोमटी, कृष्णा सातपुते, विनायक निकते, तानाजी अस्वले, राहुल लंगडेवाले, दादासाहेब ढेरे, सिद्राम चरकूपल्ली, अविनाश कैय्यावाले, अविनाश मदनावाले, सतीश सिरसिल्ला, विरू मंचाल यांनी सहकार्य केले. 

Web Title: 35 cows taken for slaughter were saved with the help of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.