खडकवासला धरणातून ३५ हजार क्युसेक; दौंड विसर्गात ७० ते ८० हजाराने वाढ होणार
By Appasaheb.patil | Published: July 25, 2024 10:18 AM2024-07-25T10:18:21+5:302024-07-25T10:19:33+5:30
खडकवासला, वडीवळे, कासारसाई, चिलईवाडी, पानशेत, मुळशी, पवना, वडज, वरसगांव हि धरणे ओव्हर फ्लो झाली असून टेमघर, आंध्रा चासकमान ही धरणे ५० टक्केपेक्षा जास्त भरली आहेत.
गणेश पोळ
टेंभुर्णी : भिमा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असल्याने सायंकाळपर्यंत दौंड विसर्गात ७० ते ८० हजार क्युसेक पर्यंत वाढ होणार असून शुक्रवार दि. २६ जुलै सायंकाळपर्यंत उजनी मृत साठ्यातून बाहेर येऊन उपयुक्त पाणी साठ्यात वाढ होणार असल्याचा अंदाज उजनी धरण व्यवस्थापक सहाय्यक अभियंता प्रशांत माने वर्तविला आहे.
मुंबईत मुसळधार पावसाने थैमान; लोकलवर परिणाम, ३-४ तासांत जोर वाढण्याची शक्यता
सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरले उजनी धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात मुसळधार पावसाची प्रतिक्षा असते. गेल्या पाच दिवसांपासून उजनीचा वरील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने सात धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून ३५ हजार ५७५ क्युसेक, कळमोडी येथून २१ हजार ४५९, वडीवळे ८ हजार २७०, कासारसाई ४ हजार ५००, वडज ४ हजार, चिलईवाडी ३ हजार ८१७ असा एकूण ७७ हजार ६२१ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. मुळशी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असून मुळशी येथून विसर्ग सोडण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता बंडगार्डन येथून ३६ हजार १११ तर दौंड येथून ४३ हजार १५० क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. वरील धरणांचा वाढलेला विसर्ग पहाता सायंकाळ पर्यंत ७० ते ८० हजार क्युसेकचा पुढे दौंड विसर्ग जाण्याचा अंदाज आहे.
भिमा खोऱ्यातील धरणे ओव्हर फ्लो गेल्या पाच दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिमा खोऱ्यातील धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. खडकवासला, वडीवळे, कासारसाई, चिलईवाडी, पानशेत, मुळशी, पवना, वडज, वरसगांव हि धरणे ओव्हर फ्लो झाली असून टेमघर, आंध्रा चासकमान ही धरणे ५० टक्केपेक्षा जास्त भरली आहेत. पवना ३७४ मिमी. मुळशी ३०५, टेमघर २१०, वरसगांव १८६, पानशेत १८३, खडकवासला ११८ मिमी. आंध्रा १०१, वडीवळे २०२, कळमोडी १२३ व डिंभे १०४ मि.मी. मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. आॕनलाईनसाठी - बातमी