बार्शीत शेतीपंपाची ३५१ कोटी, तर घरगुती, औद्योगिकची १३ कोटी थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:20 AM2021-03-20T04:20:55+5:302021-03-20T04:20:55+5:30

दीपक लहामगे म्हणाले, बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीपंपाचे २८ हजार २४६ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ३४८ कोटी ४० लाख एवढी ...

351 crore arrears of agricultural pumps, 13 crore arrears of domestic and industrial pumps | बार्शीत शेतीपंपाची ३५१ कोटी, तर घरगुती, औद्योगिकची १३ कोटी थकबाकी

बार्शीत शेतीपंपाची ३५१ कोटी, तर घरगुती, औद्योगिकची १३ कोटी थकबाकी

Next

दीपक लहामगे म्हणाले, बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीपंपाचे २८ हजार २४६ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ३४८ कोटी ४० लाख एवढी थकबाकी आहे. त्यात ९३ कोटी रुपये महावितरण सूट देणार आहे. तर ३५ कोटी रुपये विलंब आकार आणि दंड आहे. तो ही कमी केला जाणार आहे. सर्व वगळता २१९ कोटींची थकबाकी असून चालू बाकी १७ कोटी रुपये आहे.

शहर हद्दीत ३०५ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ही २ कोटी ८२ लाख थकबाकी आहे.

शासनाने या थकीत ग्राहकांसाठी सुरू केलेली कृषी संजीवनी योजना सुरू आहे. यात सप्टेंबर आणि डिसेंबरची चालू बिल भरावयाची आहेत. जुन्या बिलांमध्ये सूट व विलंब आकार अशी ६० टक्के सूट मिळणार आहे.

मार्चएन्डच्या पार्श्वभूमीवर आणि वसुलीचा आकडा मोठा असल्याने सर्व कर्मचारी, ऑपरेटर, अधिकारी वसुलीच्या कामात तैनात केले आहेत. त्यासाठी कनेक्शन कट करण्याची ही मोहीम हाती घेतली आहे. ग्राहकांनी सध्या सुरू असलेल्या सवलतीचा फायदा घेण्यासाठी वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शहरात घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक असे १५ हजार ५२०, तर ग्रामीण भागात २२ हजार ५२५ ग्राहक आहेत. यात शहरात ७ कोटी ४५ लाख तर ग्रामीण भागात ६ कोटी १५ लाख रुपये बाकी आहे.

ट्रान्सफॉर्मर बंद न करता थकीत शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडावे

सर्व प्रकारची वसुली करण्यासाठी ग्रामीण भागात एका शेतकऱ्यांचे कनेक्शन कट न करता ट्रान्सफॉर्मरवरील वीज बंद केली जात आहे. त्यामुळे ज्यांची बाकी नाही अशा शेतकऱ्यांना ही याचा फटका बसत आहे. त्यासाठी महावितरणने सरसकट ट्रान्सफॉर्मर बंद न करता ज्याचे थकीत आहे. त्याला वीजबिल भरण्यासाठी प्रवृत्त करावे. बाकी शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष मदन दराडे यांनी केली आहे.

शासकीय कार्यालयांना फटका

शहरात वीज कट करण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे हे काम करताना सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्याचा फटका शासकीय कार्यालयांना बसत आहे. त्यामुळे कनेक्शन कट करण्यासाठी सतत ट्रान्सफॉर्मर बंद न करता एकाच दिवशी म्हणजे ज्या दिवशी वीज कामानिमित्त बंद असते, त्या बुधवारी अशी थकीत असलेल्याची कनेक्शन कट करून इतरांची गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.

थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करून वीजबिल भरा

ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेकडे ही मोठ्या प्रमाणात वीजबिल थकीत आहे. त्या वसुलीसाठी तालुक्यातील ३९ पाणीपुरवठा योजनांचे कनेक्शन महावितरणने कट केले आहे. त्याची गटविकास अधिकारी शेखर सावंत यांनी दखल घेतली आहे. ग्रामपंचायतीने गावातील थकीत असलेली घरपट्टी आणि पाणीपट्टी तातडीने वसूल करून महावितरणचे बिल भरावे, अशा सूचना ग्रामसेवकांना दिल्या आहेत.

Web Title: 351 crore arrears of agricultural pumps, 13 crore arrears of domestic and industrial pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.