सिद्धेश्वर एक्स्प्रेस गाडीत ३६ मोबाईल चार्जिंग पॉर्इंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:56 AM2019-03-02T10:56:12+5:302019-03-02T10:59:04+5:30

सोलापूर : रेल्वे मंत्रालयाच्या उत्कृष्ट प्रकल्पांतर्गत सोलापूर -मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर या सिद्धेश्वर एक्स्प्रेस गाडीच्या डब्यांचे नूतनीकरण ...

36 mobile charging points in the Siddheshwar Express train | सिद्धेश्वर एक्स्प्रेस गाडीत ३६ मोबाईल चार्जिंग पॉर्इंट

सिद्धेश्वर एक्स्प्रेस गाडीत ३६ मोबाईल चार्जिंग पॉर्इंट

Next
ठळक मुद्देसिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या १७ डब्यांचे नूतनीकरण करण्यात आले रेल्वे मंत्रालयाच्या वतीने रेल्वेतील डब्यांच्या नूतनीकरणासाठी विशेष प्रकल्पांतर्गत निधी मंजूररेल्वेत विविध बदल व नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले

सोलापूर : रेल्वे मंत्रालयाच्या उत्कृष्ट प्रकल्पांतर्गत सोलापूर-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर या सिद्धेश्वर एक्स्प्रेस गाडीच्या डब्यांचे नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली़ आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा वापर वाढलेला आहे़ या वाढत्या वापरामुळे प्रवाशांची मागणी लक्षात घेता रेल्वे  मंत्रालयाने प्रत्येक रेल्वे गाड्यात मोबाईल चार्जिंग पॉर्इंट वाढविण्याचा मानस केला आहे़ त्यानुसार सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाडीत ३६ मोबाईल चार्जिंग पॉर्इंट बसविण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.

रेल्वे मंत्रालयाच्या वतीने रेल्वेतील डब्यांच्या नूतनीकरणासाठी विशेष प्रकल्पांतर्गत निधी मंजूर करण्यात आला होता़ त्यानुसार सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या १७ डब्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

यात नव्या टाईल्स, टॉयलेट पॅनल्स विनायील शीटने सुशोभित, ३६ मोबाईल चार्जिंग पॉर्इंट, पी़यु़ रंगाने रंगविले, वातानुकूलित डब्यात रंगीबेरंगी  पडदे, प्रत्येक डब्यात एरोसोल डिस्पेन्सर बसविण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी फायर बॉल्सची सुविधा
- रेल्वेत होणाºया चोºया व गैरप्रकार रोखण्यासाठी रेल्वेच्या सुरक्षा विभागाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत़ याचाच एक भाग म्हणून उत्कृष्ट प्रकल्पांतर्गत सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या नूतनीकरणात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी फायर बॉल्सची सुविधा पुरविण्यात आली आहे़ याशिवाय जंतुविरहित सोप डिस्पेंन्सर, डिजिटल हायग्रो मीटर, अ‍ॅक्रेलिक मोबाईल होल्डर्स व नाईट ग्लो बर्थ इंडिकेटर्स या प्रकारच्या सोयी पुरविण्यात आल्या आहेत़ 

या नूतनीकरणामुळे सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या सौंदर्यात भर पडली आहे़ शिवाय विविध सेवासुविधा निर्माण केल्यामुळे स्वच्छता व्यवस्थित होणार आहे़ सोलापूर मंडलातील प्रवाशांसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे़ रेल्वेत विविध बदल व नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे़ याकामी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे़
- हितेंद्र मल्होत्रा, मंडल रेल प्रबंधक, सोलापूर मंडल

Web Title: 36 mobile charging points in the Siddheshwar Express train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.