३७ कोटींच्या प्रलंबित अनुदानाची अधिवेशनात मागणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:22 AM2020-12-06T04:22:56+5:302020-12-06T04:22:56+5:30

सांगोला तालुक्यात जून ते ऑक्‍टोबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह फळबागांचे नुकसान झाले. तालुक्यातील पात्र ४५ हजार ७१६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ...

37 crore pending grant will be demanded in the convention | ३७ कोटींच्या प्रलंबित अनुदानाची अधिवेशनात मागणी करणार

३७ कोटींच्या प्रलंबित अनुदानाची अधिवेशनात मागणी करणार

Next

सांगोला तालुक्यात जून ते ऑक्‍टोबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह फळबागांचे नुकसान झाले. तालुक्यातील पात्र ४५ हजार ७१६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुमारे २८ कोटी ६५ लाख ६६ हजार इतकी रक्कम जमा केली आहे. त्याचबरोबर विविध गावातील शेतकऱ्यांची जनावरे दगावली होती. त्यांना शासनाकडून ४ लाख ९९ हजारांची मदत दिली आहे. तसेच वाहून गेलेल्या संसारोपयोगी साहित्यासाठी ६५ हजारांची मदत दिली आहे. वीज पडून मृत्यू पावलेल्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपयांप्रमाणे १२ लाख रूपयांच्या धनादेशाचे वाटप केले आहे.

३९५ नागरिकांचा प्रस्ताव प्रलंबित

सांगोला तालुक्यातील घरे पडझड होऊन नुकसान झालेल्या ४८७ लोकांना ५ लाख ५२ हजार रुपये अनुदान वाटप केले आहे. ३९५ नागरिकांच्या २३ लाख ७० हजार अनुदानाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे.

कोट :::::::::::::::::::::::

अनुदानापासून वंचित असणाऱ्या ११ गावांचा १०० टक्के अनुदानासाठीचा ५ हजार ९०३ शेतकऱ्यांचा ९ कोटी ६९ लाख ४६ हजार रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी मंजुरीसाठी प्रलंबित आहे. उर्वरित ५० टक्के अनुदानासाठी २८ कोटी असे ३७ कोटी रुपये प्रलंबित अनुदान तातडीने शेतकऱ्यांना मिळण्यासाठी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तरतूद करावी, अशी मागणी करणार आहे.

ॲड. शहाजीबापू पाटील

आमदार, सांगोला

Web Title: 37 crore pending grant will be demanded in the convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.