प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ३७ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:22 AM2021-05-26T04:22:48+5:302021-05-26T04:22:48+5:30
अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील विविध ९ रस्त्यांच्या ५२ किलोमीटर लांबीच्या बांधणीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ३७ कोटी रुपये मंजूर ...
अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील विविध ९ रस्त्यांच्या ५२ किलोमीटर लांबीच्या बांधणीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ३७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली. ग्राम सडक योजना लघुरुप (PMGSY) या योजनेचा उद्देश हा पोहोच मार्ग नसणाऱ्या खेड्यांसाठी सर्व ऋतूंमध्ये वापरण्यास योग्य असे चांगले रस्ते ग्रामीण भागात बांधणे आहे.
या गावातील रस्त्यांचा समावेश
नाविंदगी ते कल्लहिपरगे (५.५ किलोमीटर), नाविंदगी ते नागणसूर (३ किलोमीटर), नागणसूर ते हैद्रा (७ किलोमीटर) अशा या (१५.५) किलोमीटरच्या तीन रस्त्यांसाठी १२ कोटी २५ लाख ५० हजार रुपये, तर केगाव ते पानमंगरूळ (७ किलोमीटर), पानमंगरूळ ते कल्लहिपरगे (३ किलोमीटर) अशा १० किलोमीटर लांबीच्या दोन रस्त्यांसाठी ६ कोटी २४ लाख ३६ हजार रुपये तर दहिटणे ते सिंदखेड (४ किलोमीटर)साठी २ कोटी ३१ लाख २७ हजार रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे. त्याचप्रमाणे गंगेवाडीपासून कासेगाव, उळे, उळेवाडी, बक्षीहिप्परगामार्गे मुळेगाव तांडापर्यंत (१३.४ किलोमीटर), कासेगाव ते वडजी (३.४ किलोमीटर), एनएच ६५ ते मुळेगावमार्गे कुंभारी (५.५ किलोमीटर) अशा तीन रस्त्यांच्या २२.३ किलोमीटरसाठी १६ कोटी १७ लाख ८८ हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.
----
फोटो आ. सचिन कल्याणशेट्टी