३७ कोटी ६३ लाखांची वीजथकबाकी वसूल, बारामतीमध्ये सोलापूर शहर महावितरण प्रथम
By काशिनाथ वाघमारे | Published: April 8, 2023 04:17 PM2023-04-08T16:17:33+5:302023-04-08T16:18:03+5:30
पुणे प्रादेिशक विभागात द्वितीय क्रमांक पटकावला.
सोलापूर : मार्च एंडिंग काळात शहर आणि ग्रामीण भागात थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट महावितरणच्या कर्मऱ्यांपुढे होते. शहरात शंभर रुपयांवरील ग्राहकांची थकबाकी भरायला प्रवृत्त करून ती ३८ कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला आहे. ३१ मार्चपर्यंत ३७ कोटी ६३ लाखांची थकबाकी वसूल करुन बारामती परिमंडळात सोलापूर शहर महावितरणने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच पुणे प्रादेिशक विभागात द्वितीय क्रमांक पटकावला.
बारामती परिमंडलात बारामती, सातारा आणि सोलापूर हे तीन जिल्हे येत असून या तीनही जिल्ह्यांमधून वसुलीसाठी प्रयत्न सुरू होते. मार्च महिन्यात सोलापूर विभागाला ३८ कोटीची उद्दीष्ठपूर्ती दिली होती. ३१ मार्च शेवटच्या दिवसी सोलापूर जिल्ह्यात ४ कोटी १९ लाखांची वसुली झाली तर शहरात १ कोटी ४० लाखांची वीज थकबाकी वसूल झाली.
होटगी रोडवरील औद्योगिक वसाहत शाखेत थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट गाठलेल्या कर्मचाऱ्याचा गौरव करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात औद्योगिक वसाहत शाखा कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ सुनील काळे यांचा गौरव करण्यात आला. शहरातील उद्दिष्टपूर्तीचे कार्यकारी अभियंता संतोष सांगळे, शहर विभाग कार्यकारी अभियंता आशिष मेहता, सोलापूर शहर ई उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे, शाखा कार्यालय औद्योगिक वसाहतचे शाखाधिकारी एन.टी. मुजावर यांनी कौतुक केले.