दोन दिवसांत पडला ३७ मि.मी. पाऊस; सीना नदीला आले पाणी.

By दिपक दुपारगुडे | Published: October 2, 2023 07:32 PM2023-10-02T19:32:14+5:302023-10-02T19:33:07+5:30

या पावसामुळे रब्बी पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

37 mm rain in two days; water came to the river Sina | दोन दिवसांत पडला ३७ मि.मी. पाऊस; सीना नदीला आले पाणी.

दोन दिवसांत पडला ३७ मि.मी. पाऊस; सीना नदीला आले पाणी.

googlenewsNext

सोलापूर : संपूर्ण ऑगस्ट महिना ढगांकडे बघायला लावून सप्टेंबर महिन्यात जेमतेम पडलेला पाऊस ऑक्टोबर महिन्यात मात्र चांगला पडत आहे. सलग दोन दिवस पावसाने लावलेल्या हजेरीने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या दोन दिवसांत ३७.३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

१ ऑक्टोबरच्या रात्री जिल्ह्यातील सर्वच मंडळात पावसाची नोंद झाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील सोलापूर मंडळात तब्बल १२९ मि.मी. नोंद झाली आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्याची सुरुवातही कोरडीच झाली होती. सप्टेंबर अखेरला मात्र पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना ऑक्टोबर महिन्यात सलग दोन दिवस पाऊस पडतो आहे. शनिवारी जिल्ह्यात एकूण ३.३ मि.मी. तर रविवारी रात्री ३४ मि.मी. असा दोन दिवसांत ३७.३ मि.मी. पाऊस पडला. या पावसामुळे रब्बी पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

सीना नदीला आले पाणी...
मोहोळ व उत्तर तालुक्यातील नदीकाठच्या गावांत रविवारी रात्री पडलेल्या पावसामुळे सीना नदीला पाणी आले आहे. सोलापूर शहरात पडलेल्या पावसाचे पाणी बेलाटी, डोणगाव व तेलगाव शिवारातून सीना नदीला मिळत आहे. अकोलेकाटी - बीबीदारफळ - सावळेश्वर व नान्नज - बीबीदारफळ - सावळेश्वर असे दोन ओढे बीबीदारफळ गावाच्या दोन्ही बाजूंनी जातात. रविवारी रात्री पडलेल्या पावसामुळे अकोलेकाटी ओढा सकाळपासून वाहू लागला आहे.

Web Title: 37 mm rain in two days; water came to the river Sina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.