सोलापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी विकली ३७२ कोटींची वीज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:51 PM2017-12-08T12:51:04+5:302017-12-08T12:53:08+5:30

मागील दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी महावितरणला ६२१ कोटी ६४ लाख ४१ हजार २१३ युनिट वीज विक्री केली असून, त्यातून कारखान्यांना ३७२ कोटी ५७ लाख १७ हजार ८३३ रुपये रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

372 crores of electricity generated by 22 sugar factories in Solapur district, generated 372 crores 57 lakhs! | सोलापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी विकली ३७२ कोटींची वीज !

सोलापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी विकली ३७२ कोटींची वीज !

Next
ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या ३९ इतकीमागील वर्षापर्यंत २३ साखर कारखानेच वीज निर्मिती महानगरपालिकेच्या बायो-एनर्जी प्रकल्पातून तयार झालेली वीज महावितरणला विक्री


अरुण बारसकर 
सोलापूर दि ७ : मागील दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी महावितरणला ६२१ कोटी ६४ लाख ४१ हजार २१३ युनिट वीज विक्री केली असून, त्यातून कारखान्यांना ३७२ कोटी ५७ लाख १७ हजार ८३३ रुपये रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या ३९ इतकी असली तरी मागील वर्षापर्यंत २३ साखर कारखानेच वीज निर्मिती करीत होते. तयार होणाºया विजेपैकी  साखर कारखान्यांना आवश्यक वीज वापरुन उर्वरित वीज महावितरणला कारखाने विक्री करतात. सोलापूर जिल्ह्यातील सासवड माळी शुगर, विठ्ठल सहकारी वेणूनगर, सिद्धनाथ तिºहे, शंकर सहकारी, सीताराम महाराज खर्डी, लोकनेते बाबुरावअण्णा पाटील शुगर, शिवरत्न उद्योगचा विजय शुगर, भैरवनाथ शुगर, विहाळ, इंद्रेश्वर शुगर, बार्शी, विठ्ठल कॉर्पोरेशन, म्हैसगाव, लोकमंगल शुगर भंडारकवठे, सहकार महर्षी,  पांडुरंगच्या  युनिट- १ व युनिट-२, जकराया शुगर, मातोश्री लक्ष्मीबाई शुगर, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, युटोपियन शुगर,भैरवनाथ लवंगी, बबनराव शिंदे तुर्कपिंपरी,  शिवरत्न आलेगाव, जयहिंद शुगर, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना व सोलापूर महानगरपालिकेच्या बायो-एनर्जी प्रकल्पातून तयार झालेली वीज महावितरणला विक्री झाली आहे.
--------------------
कारखान्यांचे नाव    वीज युनिट    रक्कम
-सासवड माळी शुगर    ३४५६८१००    २०९५०१०६४
-विठ्ठल वेणूनगर    ४०,१८,५७४    २४५९५५३३
-सिद्धनाथ शुगर    २,८७,९०२०२    १७६४७२३३८
-शंकर सहकारी     १, २८, ६१,८४०    ७८५१६४२५
-सीताराम महाराज    १३५१९५८५    ८२६८२५९४
-लोकनेते शुगर    ३४२९४८००    २१६२५४८०८
-विजय शुगर    ८३८१४३९    ५३०४२७३९
-भैरवनाथ विहाळ    २७९९९६५६    १७१४५६९७७
-इंद्रेश्वर शुगर    १३९१७५१२    ८५४८६७७२१
-विठ्ठल म्हैसगाव    १८८०२०००    ११५१४२०३०
-लोकमंगल भंडारकवठे    ६१३६८४८०    ६७८७९८३४०
-सहकार महर्षी    ६३७७२१००    २९७१८९३२६
-पांडुरंग युनिट १    ३५१५४०००    १९७८०४२९८
-पांडुरंग युनिट २    १६१३३९४०    ९५७९६७४८
-जकराया शुगर    १९६५७०००    १२०५५०६५०
-मातोश्री लक्ष्मी शुगर    ११२०८६००    ७०५०४००३
-विठ्ठलराव शिंदे     ९५२३७५००    ५८२९३२९२५
-युटोपियन शुगर    ४८४४६१००    ३०७४९३५५९
-भैरवनाथ लवंगी    १९७७६९०९    १२५१३५००४
-बबनराव शिंदे    २७२९८५००    १७३७५५०४५
-शिवरत्न आलेगाव    १४३४३३००    ९१४४२९६१
-जयहिंद शुगर    ८९९७३००    ५१२२७३७३
-सहकार शिरोमणी    २८३८१५०    १८६८३४०८
-सोलापूर मनपा    २५८५२५    १२५३८५७
-          एकूण    ६२१६४४१२१    ३७२५७१७८३३ 

Web Title: 372 crores of electricity generated by 22 sugar factories in Solapur district, generated 372 crores 57 lakhs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.