सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना चार कोटी २५ लाख मदत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 02:53 PM2019-08-27T14:53:04+5:302019-08-27T14:56:32+5:30

पिकांचे पंचनामे सुरू;  ३५९८ लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा

4 crore 3 lakh aid to flood victims in Solapur district | सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना चार कोटी २५ लाख मदत वाटप

सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना चार कोटी २५ लाख मदत वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देपुरामुळे नदीकाठच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम अद्याप सुरू सात तालुक्यांतील ७६ हजार ७७४.९१ हेक्टर क्षेत्रापैकी १६ हजार ५८८. २0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसानग्रामीण भागातील पूरग्रस्तांना १0 तर शहरी भागातील पूरग्रस्तांना १५ हजार सानुग्रह अनुदान वाटप

सोलापूर : उजनी व वीर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने भीमा व नीरा नदीला आलेल्या पुरात नुकसान झालेल्या ३५९८ पूरग्रस्तांना चार कोटी २५ लाखांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी  दिली. 

शासनाने पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. त्याप्रमाणे ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना १0 तर शहरी भागातील पूरग्रस्तांना १५ हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यासाठी विशेष निधी दिला होता. या निधीतून जिल्ह्यातील १0२ पूरबाधित गावांतील ३५९८ पूरग्रस्तांना रोख पाच हजार तर उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. पूरग्रस्तांमध्ये शहरी विभागात पंढरपूर शहरातील १२९९ लाभार्थ्यांचा समावेश आहे तर ४४ गावांतील २२९९ लाभार्थी ग्रामीण भागातील आहेत. पंढरपूर तालुक्यातील १५५१ व शहरातील १२९९ पूरग्रस्तांना तीन कोटी ४९ लाख ९५ हजार इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे.
 
इतर तालुक्यांतील बाधित गावे व पूरबाधितांना वाटप केलेली रक्कम पुढीलप्रमाणे आहे. दक्षिण सोलापूर: गावे: १६, बाधित: ११७, वाटप रक्कम: ११ लाख ७0 हजार, अक्कलकोट: ३, बाधित: ७, रक्कम: ७0000, मोहोळ: ४, बाधित: २७, रक्कम: २ लाख ७0 हजार, माढा: १, बाधित: १, रक्कम: १0 हजार, माळशिरस: २३, बाधित: ४५९, रक्कम: ४५ लाख ९0 हजार, मंगळवेढा: ११, बाधित: १३७, रक्कम: १३ लाख ७0 हजार. अनुदान वाटपाचे काम २३ आॅगस्ट रोजी शंभर टक्के पूर्ण झाले आहे. 


पिकांचे पंचनामे सुरू
- पुरामुळे नदीकाठच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम अद्याप सुरू आहे. पुरामध्ये अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, माढा, मंगळवेढा आणि माळशिरस या सात तालुक्यांतील ७६ हजार ७७४.९१ हेक्टर क्षेत्रापैकी १६ हजार ५८८. २0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा फटका १८ हजार ५१७ शेतकºयांना बसला आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. 

Web Title: 4 crore 3 lakh aid to flood victims in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.