चार कोटी ४० लाखांचे घरकुल अनुदान थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:16 AM2021-07-20T04:16:52+5:302021-07-20T04:16:52+5:30
नगरपालिकेडे राज्य शासनाच्या हिश्श्यातील ५२ लाभार्थ्यांसह केंद्र शासनाच्या हिश्श्याचे अनुदान तात्काळ द्यावे म्हणून १२ जानेवरी २०२० रोजी २६ लाभार्थ्यांनी ...
नगरपालिकेडे राज्य शासनाच्या हिश्श्यातील ५२ लाभार्थ्यांसह केंद्र शासनाच्या हिश्श्याचे अनुदान तात्काळ द्यावे म्हणून १२ जानेवरी २०२० रोजी २६ लाभार्थ्यांनी मागणीचे निवेदन दिले होते. राज्याच्या मंत्रालयात १३ जानेवारी रोजी या योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी अनुदान मिळाले नसून सदरच्या लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान वितरित करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. केंद्र शासनाने दुसऱ्या टप्प्यातील ५२ लाभार्थ्यांना ६० हजार इतके अनुदान दिले. सध्या पहिल्या टप्प्यातील १९८ लाभार्थ्यांचे दीड लाखाप्रमाणे तर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील १५९ लाभार्थ्यांचे ६० हजारांचे अनुदान सध्या रखडल्याने लाभार्थी अडचणीत आले आहेत.
कोट :::::::::::::::::::::::::::
अनुदानास विलंब होत असल्यामुळे लाभार्थी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. प्रलंबित अनुदान देण्याबाबत नगरसेवकांनी मागणी केली आहे. राज्य शासनाच्या झालेल्या बैठकीत आम्ही लाभार्थ्यांच्या अडचणीबाबत कल्पना दिली आहे.
- अरुणा माळी
नगराध्यक्षा, मंगळवेढा