३३९ बिलांमधून केली ४ लाख ८२ हजारांची कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:23 AM2021-05-12T04:23:05+5:302021-05-12T04:23:05+5:30

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. तालुक्यात १४ खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. खाजगी ...

4 lakh 82 thousand deducted from 339 bills | ३३९ बिलांमधून केली ४ लाख ८२ हजारांची कपात

३३९ बिलांमधून केली ४ लाख ८२ हजारांची कपात

Next

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. तालुक्यात १४ खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. खाजगी रुग्णालयांकडून आकारलेल्या बिलांचे शासन निर्णयानुसार लेखापरीक्षण करण्यात येत आहे. खाजगी रुग्णालयामधील बिलांची तपासणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या नेतृवाखाली ६ पथकांच्या टीमने ३३९ बिलाची तपासणी केली.

या पथकात उपकोषागार अधिकारी संजय सदावर्ते, सहायक निबंधक एस. एम. तांदळे हे कार्यरत आहेत. पंढरपूर शहरामधील गॅलक्सी, लाइफलाइन, श्री गणपती, जनकल्याण, अ‍ॅपेक्स, श्री विठ्ठल, पावले, वरदविनायक, मेडिसिटी, ऑक्सिजन पोलीस, पडळकर, विठ्ठल, डीव्हीपी, तसेच करकंब येथील जगताप हॉस्पिटल या खाजगी १४ खाजगी रुग्णालयांत कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

या रुग्णालयातील बिले पथकांनी तपासली असून, जादा बिले आकरण्यात आल्याने तब्बल ४ लाख ८२ हजार २०० रुपये कमी करण्यात आले आहेत.

----

संबंधित हॉस्पिटलमधील बिलासंबंधी कोणाला बिलांबाबत शाशंकता असेल त्यांनी बिल अदा करण्यापूर्वी प्रांत कार्यालय पंढरपूर येथील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. तसेच लेखी स्वरूपात तक्रारी दाखल कराव्यात.

- सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर

Web Title: 4 lakh 82 thousand deducted from 339 bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.