अकलूज बायपास ते वेळापूर मार्गासाठी ४० कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:26 AM2021-08-13T04:26:49+5:302021-08-13T04:26:49+5:30

मोहिते-पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यावर ते म्हणाले, संत ज्ञानेश्वर व ...

40 crore demand for Akluj bypass to Velapur route | अकलूज बायपास ते वेळापूर मार्गासाठी ४० कोटींची मागणी

अकलूज बायपास ते वेळापूर मार्गासाठी ४० कोटींची मागणी

Next

मोहिते-पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यावर ते म्हणाले, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामुळे देहू-आळंदी-पंढरपूर-मोहोळपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या दोन्ही महामार्गांना जोडणारा अकलूज बायपास (राऊतनगर) किलोमीटर ० ते किलोमीटर ३ (प्रतापसिंह चौक) व गांधी चौक ते प्रतापसिंह चौक किलोमीटर २७ ते किलोमीटर ३२ व वेळापूर पालखी चौक हा सुमारे १५ किलोमीटर रस्ता खराब झाला आहे.

या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात लहान-मोठ्या वाहनांची, उसाचे ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडी यांची वाहतूक होते. हा रस्ता त्वरित व्हावा यासाठी ४० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी केली आहे. या मागणीला नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखविला असून, त्यासाठी केंद्रीय रस्ते विकास निधीतून तातडीने निधी देऊ, असे म्हणाल्याचे मोहिते-पाटील यांनी सांगितले.

120821\1852-img-20210812-wa0016.jpg

नवीदिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भेट घेतली

Web Title: 40 crore demand for Akluj bypass to Velapur route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.