४० कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता ४८ गावांचा पाणीपुरवठा:

By admin | Published: May 11, 2014 12:00 AM2014-05-11T00:00:40+5:302014-05-11T00:00:40+5:30

कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याचे सुधारित अंदाजपत्रक

40 crores budget for drinking water sanctioned: | ४० कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता ४८ गावांचा पाणीपुरवठा:

४० कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता ४८ गावांचा पाणीपुरवठा:

Next

 

मंगळवेढा : शहर व तालुक्यातील ४८ गावांसाठी पाणीपुरवठा करण्याकरिता उचेठाण येथे बांधण्यात येणार्‍या कोल्हापूर पध्दतीच्या बंधारा कम पुलाच्या सुधारित ४० कोटी ३७ लाखांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती आ. भारत भालके यांनी दिली. मंगळवेढा शहरासाठी भीमा नदीवर उचेठाण येथे बंधारा बांधणे व आवश्यक उपायांचा समावेश करून यु. आय. डी. एस. एस. एम. टी. ही योजना प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु केंद्र शासनाने योजनेतील बंधारा वगळून मंगळवेढा पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास मान्यता दिली होती. त्यामुळे मंगळवेढा शहरासाठी उचेठाण येथे बंधारा बांधण्याचा प्रस्ताव सुजल निर्मल कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित करण्यात आला होता. प्रस्तावाचा वित्तीय आकृतिबंध सार्वजनिक बांधकामाचा हिस्सा ८७२ लाख, मंगळवेढा नगरपरिषदेने उभारावयाची लोकवर्गणी १०५ लाख व शासन अनुदान (शहर व ग्रामीण) ३०६० लाख आहे. मंगळवेढा तालुक्यातील ४८ गावांसाठी व शहरासाठी असलेल्या सदर योजनेची लोकवर्गणी मूळ मंजुरीच्या वेळी असलेल्या प्रचलित धोरणानुसार भरण्यात येईल. यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष फिरोज मुलाणी, पं. स. सभापती संभाजी गावकरे, जि. प. सदस्या अंकिता गरंडे, पं. स. सदस्या निर्मला काकडे, लता कोळेकर, माजी सभापती भुजंगराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष मुझफ्फर काझी, न.पा.विरोधी पक्षनेते अजित जगताप आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

--------------------------------------------

अशी असणार तरतूद

 ४८ गावांसाठी व मंगळवेढा शहरासाठी उचेठाण येथे बांधण्यात येणार्‍या कोल्हापूर पध्दतीच्या बंधारा कम पूलाच्या योजनेच्या ४० कोटी ३७ लाख २६ हजार इतक्या रकमेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मुख्य बंधार्‍याचे काम ३६७८.८१ लाख, भुसंपादन - ९.६९ लाख, हत्यारे व सयंत्रे ३४८.७६ लाख असे एकूण ४० कोटी ३७ लाख २६ हजार निधीची तरतूद करण्यात आली आहे. ४मंगळवेढा शहर व ४८ गावांना पिण्याच्या पाण्याची या योजनेअंतर्गत चांगली सोय होणार आहे.

Web Title: 40 crores budget for drinking water sanctioned:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.